Download App

Ajay Devgn: सिंघमचा ‘मैदान’ सिनेमा तब्ब्ल सातव्यांदा पुढे ढकलण्यात आला; काय आहे नेमकं कारण ?

Ajay Devgn: ‘बधाई हो’ सिनेमाचे दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा (Directed by Amit Sharma) यांचा आगामी ‘मैदान’ (Maidan) हा सिनेमा परत एकदा चर्चेत आला आहे. सिंघम (Singham)  म्हणजेच अजय देवगणची (Ajay Devgn) प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे पहिल्यांदा नव्हे तर चक्क सातव्यांदा असे घडल्याचे दिसून आले आहे.


दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर बेतलेला हा सिनेमा पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. या सिनेमाशी जोडलेल्या एका व्यक्तीने याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने सांगितले आहे की, ‘मैदान’ हा आमच्याकरिता खूपच महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. सिंघमने यामध्ये प्रसिद्ध कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारले आहे.

दिग्दर्शक अमित शर्मा यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे सांगितले जात आहे. एवढेचं नव्हे तर दिग्दर्शकाने जगभरातील फुटबॉलपटूंना आमंत्रित केले आहे आणि त्यांच्यासोबत एक फुटबॉल सीरिज देखील आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय खेळाडू या अनेक देशांबरोबर फुटबॉल खेळणार आहेत. या सामन्याचे चित्रीकरण आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे.

Sai Tamhankar: चर्चा तर होणारच! ‘क्राइम बीट’मधला सई ताम्हणकरचा लेस्बियन किसिंग सीन व्हायरल

परंतु यासाठी दिग्दर्शक आणि संपूर्ण सिनेमाची टीम प्रचंड मेहनत घेत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. ‘मैदान’ हा सिनेमा २३ जूनला प्रदर्शित होणार होता, पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. ‘भोला’ आणि ‘दृश्यम २’ या सिनेमानंतर सिंघमच्या या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज