Download App

Maidaan Trailer : प्रतीक्षा संपली! अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Ajay Devgn Maidaan Trailer Released : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या दोन बॅक टू बॅक चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. त्याचे ‘शैतान’ (Shaitan) आणि ‘मैदान’ (Maidaan ) हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अभिनेता खूप दिवसांनी पुनरागमन केला आहे. (Social Media) गेल्या वर्षी ‘शंकर’ प्रदर्शित झाला, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता या अभिनेत्याच्या दोन्ही चित्रपटांकडून सगळ्यांनाचं मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, ‘मैदान’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी त्याचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे.


‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगणची दमदार स्टाईल पाहायला मिळणार आहे. त्याचा हा लूक आत्तापर्यंतच्या पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. यामध्ये त्याने भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपण ट्रेलरबद्दल बोललो तर ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्यात भारताची आपल्या अस्मितेची लढाई दाखवण्यात आली आहे, जी फुटबॉल खेळाडू ‘मैदानावर’ लढतात. यात अजय देवगणचा अभिनय मन जिंकणारा आहे. ट्रेलरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटात फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवला : सिनेमाच्या कथेबद्दल बोललो तर ते फुटबॉलचा सुवर्ण काळ दाखवले आहे, यममध्ये भारताकडे सर्व ट्रॉफी होत्या. 1952 ते 1962 हा फुटबॉलचा सुवर्णकाळ यात दाखवण्यात आला आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हा सुवर्णकाळ मानला जातो. हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे.

Ajay Devgan : चार वर्षानंतर सिंघम अभिनेता ‘मैदान’ मारण्यास सज्ज, जाहीर केली रिलीज डेट

अक्षय कुमारच्या चित्रपटाचा संघर्ष : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘मैदान’ हा चित्रपट 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. यासोबतच अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा एक ॲक्शनपॅक्ड चित्रपट आहे. त्यात टायगर श्रॉफही दिसणार आहे. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीतील दोन मोठे स्टार्स पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये आमने- सामने येणार आहेत. अशा परिस्थितीत या दोन चित्रपटांमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us