Akshay Kumar OMG 2 : बॉलिवूड खिलाडी भाई अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉरने या सिनेमातील तब्बल २० दृश्यांवर कात्री लावल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता सेन्सॉरने या सिनेमाला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ११ ऑगस्टला हा हटके सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘ओएमजी 2’ या सिनेमाचे कथानक होबोफोबियावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. त्यात लैंगिक शिक्षणाचा देखील भाग असल्याचे समोर आले होते. या सिनेमाच्या कथेमधील मुलगा समलैंगिकतेच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे ट्रेलर मधून दिसून आले आहे. त्यानंतर शिवभक्त असलेले पंकज त्रिपाठी लोकांना होमोफोबियाविषयी जागरूक करण्याचे काम हाती घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘ओह माय गॉड 2’ हा सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास बोर्डाकडून अगोदर नकार देण्यात आला होता. पुढे कमिटीने निर्मात्यांनी २० कट्स सुचवले. तसेच लैंगिक शिक्षणाचा मुद्दा देखील आल्याने आणि सिनेमातील काही दृश्यांमुळे खिलाडीच्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट म्हणजेच अडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे. यामुळे आता हा सिनेमा आता चाहत्यांना पाहता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा रिव्ह्यू कमिटीकडे पाठविण्यात आला होता. या सिनेमाचे सेन्सॉर प्रमाणपत्र आणि कट्सबद्दल काही माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, रिव्ह्यू कमिटीने खिलाडी याचा हा सिनेमा बघितला आहे. या सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, या निष्कर्षापर्यंत कमिटीने आढावा घेतला आहे. एवढेच नाही तर, सिनेमा बघितल्यानंतर समितीने सिनेमात २० कट्स करण्यास सांगितले असल्याचे देखील सांगितले होते.
Ashok Saraf : कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सराफ कुटुंबाने केला रंगकर्मींचा गौरव
परंतु आतापर्यंत सीबीएफसीने या कट्सविषयी निर्मात्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस जारी केली नाही. यामध्ये या कट्सचे कारण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खिलाडीचा हा सिनेमा ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून निर्मात्यांनी सिनेमातील एक गाणे देखील रिलीज करण्यात येणार होते. सिनेमातील हे गाणे चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता सेन्सॉरकडून कट्सची विचारणा झाल्यामूळे अशा स्थितीत खिलाडीच्या सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचा अंदाज लावला होता.