Download App

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

Bade Miyan Chote Miyan Budget: ईदच्या मुहूर्तावर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मध्ये खळबळ माजवणार आहेत. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. (Social media) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला खूप पसंती मिळाली आहे. ट्रेलरनंतर चित्रपटाची क्रेझ अधिकच वाढली आहे. बडे मियाँ छोटे मियाँची स्टारकास्ट बरीच मोठी आहे. त्यामुळे त्याचे बजेटही खूप जास्त आहे. चला तुम्हाला चित्रपटाच्या बजेटबद्दल जाणून घेऊया…

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ॲक्शन सीनवर निर्मात्यांनी खूप पैसा गुंतवला आहे. तसेच, त्याचे शूटिंग परदेशात देखील झाले आहे. त्यामुळे त्याचे बजेट दिवसेंदिवस वाढत गेले. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे बजेट इतके आहे की, ते एवढी कमाई करू शकेल की नाही याबद्दल चाहत्यांना शंका आहे.

चित्रपटाचे बजेट जाणून घ्या…

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या बजेटबद्दल सांगायचे तर हा चित्रपट 350 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटातील बड्या स्टारकास्ट आणि ॲक्शन सीन्सवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या बजेटबद्दल सांगितले. अली म्हणाला की, जर तुम्हाला बाईक स्टंट करायचा असेल तर 4 लाख रुपये लागतील, पण जर स्टंट चुकला तर तुम्हाला लगेच 4 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. जर तुम्ही कार उडवण्याचा स्टंट करत असाल तर त्याची किंमत 30-40 लाख रुपये इतके मोजावे लागणार आहे. स्टंट एका वेळी बरोबर नसेल, तर तुमचे थेट नुकसान सहन करावा लागणार आहे.

पहिल्याच आठवड्यात ‘द गोट लाइफ’ची कोट्यवधींची कमाई, लवकरच पार करणार बजेटचा आकडा

एका दिवसासाठी इतका खर्च व्हायचा

अली पुढे म्हणाला की, बडे मियाँ छोटे मियाँमध्ये असे काही स्टंट आहेत, ज्यांची किंमत एका दिवसात 3- 4 कोटी रुपये आहे. सर्व हेलिकॉप्टरवरील उपकरणे आणि तंत्रज्ञांसह सर्वकाही खूप महाग होते.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची टक्कर अजय देवगणच्या मैदानाशी होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

follow us

वेब स्टोरीज