Akshaya Naik makes her television debut in the industry; will do ‘Taskaari‘ with Emraan Hashmi : सुंदरा ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहे. वर्ष संपताना तिने प्रेक्षकांना ही खास बातमी दिली असून काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण करून मराठी सोबतीने हिंदी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता लवकरच अक्षया अजून एका बड्या बॉलिवूड प्रोजेक्टचा महत्वपूर्ण भाग होणार आहे.
मतदान केंद्र असलेल्या शाळांना 19 व 20 डिसेंबरला सुट्टी; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे आदेश
नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी “तस्करी” वेब सीरिज मध्ये अक्षया अनेक बॉलिवूड मधल्या बड्या स्टार्स सोबत दिसणार आहे. नुकताच तस्करीचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि यात ती एका सीन मध्ये इम्रान हाश्मी सोबत दिसतेय. पहिली वहिली वेब सीरिज आणि त्यात सुद्धा इम्रान सारख्या कलाकारांसोबत सोबत काम करणं हा अक्षया साठी जॅकपॉट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
तस्करी मधल्या अनुभवाबद्दल बोलताना अक्षया सांगते ” इम्रान हाश्मी सरांसारख्या बॉलिवूडच्या बडा स्टार सोबत आपण काम करतोय ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे अगदीच 2/3 सीन होते पण ते करताना देखील थोड दडपण आलं आणि तेवढं छान सुद्धा वाटलं. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इम्रान हाश्मी सरंसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं”
लाडक्या बहिणींना धक्का, नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता थेट जानेवारीत मिळणार? जाणून घ्या सर्वकाही
फॅशन असो वा अभिनय ती कायम चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे आता येणाऱ्या काळात ती अजून नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आणि भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.
