Download App

कॅटरीना- दीपिकानंतर Alia Bhatt दिसणार यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये; सीईओंची माहिती

Alia Bhatt : सध्याच्या बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट ( Alia Bhatt ). तिने अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. आगामी वेब सिरीज पोचरसाठी ती कार्यकारी निर्माती म्हणून काम पाहत आहे. त्याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या लव अंड वाॉरबद्दल देखील आलिया चर्चेत आहे.

‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा खो; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’

त्यानंतर आता आल्याबद्दल आणखी एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे कॅटरिना आणि दीपिका नंतर यशराज फिल्म्सच्या युनिव्हर्समध्ये आलिया देखील मुख्य भूमिका निभावणार आहे. पाहुयात कोणता आहे हा प्रोजेक्ट? नुकतचं यशराज फिल्मचे सीईओ अक्षय विधानी यांनी आलिया भट ही यशराज फिल्म्सच्या हेरगिरीच्या संदर्भातील आणखी एका चित्रपटात अभिनयच नाही तर त्याचं दिग्दर्शन देखील करणार आहे.

आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत; बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा

या चित्रपटाचं शूटिंग यावर्षीच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. स्पाय युनिव्हर्स हे यशराज फिल्मचे फ्रेंचाईजी आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या चित्रपटातील पात्र एकत्र येणार आहेत. ज्यामध्ये सलमान खानचा टायगर, रितिक रोशनचा वॉर शाहरुख खानचा पठाण यासारखे चित्रपटांचा उल्लेख आहे.

दरम्यान सध्या आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं. तर ती आगामी चित्रपट जिगरामध्ये दिसणार आहे. त्यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील रणबाीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच आलिया रणबीर आणि विकी कौशल हे त्रिकोण प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

follow us

वेब स्टोरीज