Allu Arjun : वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात (Wayanad landslide) आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. सध्या वायनाड बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातच लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) भूस्खलनग्रस्त वायनाडमधील मदत कार्यासाठी पुढे आला आहे. त्याने केरळच्या सीएम रिलीफ फंडात 25 लाख रुपये दिले आहे.
याबाबत माहिती देताना तेलगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन ‘X’ वर लिहिले आहे की, वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दुःख झाले आहे. केरळने नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मी पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपये देणगी देऊन योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. याच बरोबर तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. असं पोस्ट त्याने ‘X’ वर केले आहे.
वायनाड जिल्ह्यात 30 जुलैच्या पहाटे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे तर अनेकजण बेपत्ता झाले आहे. अल्लू अर्जुनपूर्वी प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेता मोहनलालने देखील आपत्तीग्रस्त भागातील पुनर्वसनासाठी 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.
मोहनलाल हे इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल देखील आहेत. त्यांनी आपल्या ‘X’ वर आपत्तीग्रस्त ठिकाणाची अनेक फोटो पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी पोस्टवर म्हटले आहे की, वायनाडमधील विध्वंस ही एक खोल जखम आहे जी बरी होण्यास वेळ लागेल. प्रत्येक घर उध्वस्त होणे आणि जीवनात व्यत्यय येणे ही शोकांतिका आहे.
खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग वाढला, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर तैनात
तमिळ अभिनेते कमल हासन, सुर्या, ज्योतिका, कार्ती, विक्रम, नयनथारा आणि विघ्नेश शिवन आणि इतर मल्याळम कलाकार मामूट्टी, दुल्कर सलमान, फहद फासिल, नाझरिया आणि टोविनो थॉमस यांनी देखील मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीला 25 लाख रुपये, मामूटी यांनी 20 लाख रुपये, दुलकर यांनी 15 लाख रुपये आणि टोविनो यांनी 25 लाख रुपये, तर फहाद आणि नाझरिया यांनी 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.