Amala Paul Announces First Pregnancy: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलने (Amala Paul ) नुकतेच बॉयफ्रेंड जगत जोशीसोबत (Jagat Joshi) लग्न केले. तिचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत. दरम्यान आता लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नन्सीबाबत (Pregnancy) गोड बातमी दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. सध्या अभिनेत्रीचे एक फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. अमला वयाच्या 32 व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलासाठी उत्साहित झाल्याचे दिसत आहे.
अमला पॉलने इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटो शेअर करून तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितली आहे. (Baby Bump) सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा मांडी हाय स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे. ती समुद्रकिनारी पोज देत आहे आणि तिचा बेबी बंप दिसत आहे. यातील तिचा लूक पाहण्यासारखा आहे. फोटो शेअर करण्यासोबत अमला पॉलने त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘आता मला कळले आहे की माझ्यासोबत 1+1 म्हणजे 3.’ ही बातमी समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अमला पॉलच्या पोस्टवर काजल अग्रवालने लिहिले आहे की, ‘तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. खूप प्रेम आणि आशीर्वाद.” यासोबतच चाहत्यांनी अनेक शुभेच्छा आणि भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर एक यूजरने लिहिले की, ‘आधी गर्भधारणा निश्चित करा आणि नंतर लग्न करा. आजकाल असेच घडत आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुझे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. अशा भन्नाट प्रतिक्रिया अभिनेत्रीला मिळत आहे.
100 कोटींपेक्षा अधिक हिट सिनेमा दिलेले टॉप अभिनेते कोण? जाणून घ्या रणबीरचं स्थान
अमला पॉलने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल चांगली बातमी शेअर केली होती. अमलाने सांगितले होते की, जगत देसाईने तिला प्रपोज केले होते आणि तिने ‘हो’ म्हटले होते. त्यांचा व्हिडिओही देखील समोर आला होता, यामध्ये जगत या अभिनेत्रीला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करताना दिसत होते. अमलाचे हे दुसरे लग्न आहे. तिने 2017 मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. अभिनेत्रीने 2014 मध्ये एएल विजयसोबत लग्न केले.