The Lady Killer: अर्जुन कपूर अन् भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

The Lady Killer: अर्जुन कपूर अन् भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

The Lady Killer Trailer Out: अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘द लेडी किलर’ (The Lady Killer) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोमान्स करत चाहत्यांचे मनोरंजन करताना बघायला मिळत आहेत.

‘द लेडी किलर’ या सिनेमाचा ट्रेलर 2 मिनिट 22 सेकंदाचा आहे. अर्जुन कपूरच्या हटक्या एन्ट्रीने ट्रेलरची सुरुवात होते. सिनेमात अर्जुन एका नव्या शहरामध्ये राहायला गेल्याचे बघायला मिळत आहे. या नव्या शहरामध्ये त्याला भूमी पेडणेकर भेटते. ट्रेलरमध्ये अर्जुनचा एकदम खतरनाक लूक बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे भूमीही अर्जुनला टक्कर देत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे. यावर नेटकरी देखील अर्जुनच्या अभिनयाचं जोरदार कौतुक करत आहेत.

‘द लेडी किलर’ या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करत असल्याचे बघायला मिळणार आहेत. ट्रेलरमधील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अर्जुनच्या करिमध्ये ‘द लेडी किलर’ हा सिनेमा सुपरहिट होणार असा अंदाज लावला जात आहे. अजय बहलने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर ‘द लेडी किलर’ हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Kastoori : ‘या’ कारणाने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कस्तुरी’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे

अर्जुनचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. प्रेम, द्वेष, अनैतिक संबंध अशा सर्व गोष्टी ‘द लेडी किलर’ या सिनेमात चाहत्यांना बघायला मिळणार आहे. अजय बहल, यांनी या धमाकेदार सिनेमाची कथा लिहिली आहे. अर्जुन आणि भूमीसह या सिनेमात मृत्यूंजय पांडे, प्रियंका बोस आणि एसएस जहीर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे दिसणार आहेत.

अर्जुन कपूर व्यावसायिक कामापेक्षा अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरासोबत त्याचं नाव कायम जोडलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला अर्जुनने खास शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा चाहते त्यांना ट्रोल करताना बघायला मिळत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube