Kastoori : ‘या’ कारणाने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कस्तुरी’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे

Kastoori : ‘या’ कारणाने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कस्तुरी’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे

Kastoori Movie Release Date: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या (National Award ) ‘कस्तुरी’ (Kastoori Movie) या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.(Marathi Movie) अगोदर हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार होता. अद्याप या सिनेमाची नवी प्रदर्शनाची तारीख समोर आली नाही. ‘कस्तुरी’ या मराठी सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते प्रतीक्षा करत होते. परंतु आता प्रेक्षकांना आणखी काही दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Payal Dhoke (@payaldhoke16)


‘कस्तुरी’ या सिनेमाच्या निर्मात्या पायल ढोके (Payal Dhoke) यांनी एका दिलेल्या मुलाखतीत ‘कस्तुरी’चं प्रदर्शन लांबणीवर गेल्याचं जाहीरपणे सांगितले आहे. पायल म्हणाल्या की, ” काही तांत्रिक अडचणी आल्याने ‘कस्तुरी’ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हाती घेतला आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही. लवकरच सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

‘कस्तुरी’ या मराठी सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा विनोद कांबळे यांनी सांभाळली आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि अनुराग कश्यप यांनी या मराठी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. या सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शक यांचा हा पहिला सिनेमा असणार आहे.

पहिला सिनेमा असून देखील त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हा सिनेमा बघण्यासाठी चाहते खूप उत्सुकता झाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवामध्ये देखील हा सिनेमा निवडला गेला आहे. ‘कस्तुरी’ हा मराठी सिनेमा चाहत्यांना भावला असून सर्वत्र त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं आहे.

Gaurav More: मराठी सिनेमाच्या दुरवस्थेबद्दल गौरव मोरेनी व्यक्त केली खंत

‘कस्तुरी’ हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. सनी चव्हाण नामक एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाची गोष्ट या मराठी सिनेमात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची चांगलीच धडपड या सिनेमात चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आर्थिक आणि सामाजिक कारणामुळे शाळकरी मुलं शिक्षणापासून कशी वंचित राहतात, हे या सिनेमात दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना आता मोठी उत्सुकता लागली आहे. अनेक नवोदित कलाकारांची फळी या सिनेमात आहे. समर्थ सोनवणे या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube