100 कोटींपेक्षा अधिक हिट सिनेमा दिलेले टॉप अभिनेते कोण? जाणून घ्या रणबीरचं स्थान
Top 3 Actors: चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिलेल्या 100 कोटी आणि हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या (Bollywood) तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर गाजणारा अभिनेता नेमकं कोण? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं सध्या समोर आली आहेत, जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रणवीर सिंग आणि आयुष्मान खुराना या अभिनेत्यांचा समावेश आहे.
रणबीर कपूरचे सात ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत, ज्यांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.यामध्ये अॅनिमल, तू झुटी मैं मकर, ब्रह्मास्त्र, संजू, ए दिल मुश्किल, ये जवानी है दिवानी आणि बर्फी. तसेच रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत.
रणवीर सिंगचे (Ranveer Singh) ही बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचे चित्रपट आहेत. यामध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, 83, गली बॉय, सिम्बा, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि राम लीला. तसेच अभिनेता रणवीर सिंगहे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे जोरदार चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीरने सिनेसृष्टीत त्याची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक अभिनयातून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही ‘त्या’ दिवसाची…”
आयुष्मान खुराणाने (Ayushmann Khurrana) यादरम्यान जगभरातील पाचशे कोटी हिट्स मिळवले आहेत. यामध्ये बाला, ड्रीम गर्ल, बधाई हो, ड्रीम गर्ल 2 आणि अंधाधुन या सिनेमाचा समावेश आहे. तसेच आयुष्मान हा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या सिनेमामध्ये सामाजिक विषय हाताळले जात असतात. त्याने ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, यामध्ये त्याने विकी अरोरा या स्पर्म (शुक्राणू) डोनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देण्यात आला होता.