नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एका हिंदी वाहिनीने मुलाखत घेतली यावेळी त्यांना चित्रपट क्षेत्राविषयी काही प्रश्न विचारण्यात आले यावेळी त्यांनी अगदी मिश्किलपणे या प्रश्नांना उत्तरं दिली. दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडचे चित्रपट यामध्ये सुरू असलेली स्पर्धा. प्रेक्षकांनी दाक्षिणात्य चित्रपटांना दिलेला प्रतिसाद यावर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.
भारताला ऑस्कर पुरस्कार मिळाला पण यामध्ये देखील उत्तर आणि दक्षिण भारत अशी विभागणी झाल्याचं पाहायला मिळालं. यावर अमित शाह यांना प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, ‘भारताला कोणीही ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. तरी त्याचा अभिमान असला पाहिजे. आम्हाला तो अभिमाल आहे. दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडचे चित्रपट यामध्ये जी विभागमी झाली आहे ती दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी नाही. मी देखील चित्रपट पाहतो.’
गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिट झाले. मी त्यांचं निरीक्षण केलं. त्यामध्ये हे प्रसिद्ध झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भारतीय संस्कृती दाखवण्यात आली आहे. त्या चित्रपटांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. भारत बदलत आहे. असं अमित शाह म्हणाले. पुढे त्यांना दाक्षिणात्य चित्रपट भारतीय संस्कृती पुढे नेत आहेत का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘भारतीय संस्कृती कोणीही पुढे नेऊ शकत. त्यात उत्तर दक्षिण असं काही नाही.’
Chandrashekhar Bawankule : जागावाटपाच्या ‘त्या’ मुद्द्यावरुन बावनकुळेंचा घुमजाव
पुढे त्यांना विचारण्यात आले की, भारतीय संस्कृती पुढे नेण्यात मागे पडत आहेत का ? असा प्रश्न विचारला असता ते मिश्किलपणे म्हणाले, ‘मी इथं या वादावर बोलायला आलेलो नाही तुम्ही मला यावर बोलायला लावू नका. पण प्रेक्षकांची आवड बदलत आहे. त्यानुसार चित्रपट बनवायला हवे. असं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं.