Chandrashekhar Bawankule : जागावाटपाच्या ‘त्या’ मुद्द्यावरुन बावनकुळेंचा घुमजाव

Chandrashekhar Bawankule : जागावाटपाच्या ‘त्या’ मुद्द्यावरुन बावनकुळेंचा घुमजाव

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही विधानसभेच्या 240 लढवणार असे म्हटले होते. यावरुन आता त्यांनी सारवासारव केली आहे. तसेच त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. अजून आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, असे ते म्हणाले आहेत.

प्रसिध्दी प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना बावनकुळे म्हणाले होते की,  2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहा. ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. या निवडणुकीत आपला पक्का विजय आहे. 160-165 जागांवर भाजप निवडून येईल. या निवडणकीत भाजपनं 240 जागा लढवण्याची तयारी केली आहे. तर शिवसेनेला केवळ 48 जागा मिळतील. कारण, शिवसेनेकडे 50 पेक्षा जास्त जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असं सांगितलं.

बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…

यावरुन आता त्यांनी घुमजाव केला आहे. आमच्या दोन्ही पक्षामध्ये कोणतेही जागावाटप झाले नसून अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. निवडणुकीत 240 जागा लढवण्याचे वक्तव्य मी कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी व निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासाठी केले, असे बावनकुळे म्हणाले आहेत. शिंदे गटाकडे ज्या जागा आहेत त्याठिकाणी भाजपच्या तयारीचा त्यांना फायदा होईल, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

दरम्यान, हा कार्यक्रम भाजपचा अंतर्गत होता. याठिकाणी माध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे आगामी काळातील शिवसेना-भाजपचे जागा वाटप कसे होईल याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. बावनकुळे यांचा व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटविण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube