Download App

Amitabh Bachchan यांचा वाढदिवस अन् किरण मानेची खास पोस्ट; ‘बच्चन’ मनात, मेंदूत-रक्तात धगधगतोय

Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्याने आणि पोस्टमुळे चर्चेत असणारा अभिनेता किरण माने याने देखील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे.

काय म्हणाला किरण माने?

अभिनेता किरण माने याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर खास पोस्ट केली आहे. यावेळी त्याने त्याच्यासाठी बनवण्यात आलेलं मीम देखील शेअर केलं. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर नमस्कार मी मुंबईचा किरण माने. त्यानंतर त्याने लिहिले की, ‘या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबाॅसमध्ये ‘सातारचा बच्चन’ हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती… पन तरीबी ‘मराठी मीम माॅंक्स’वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलंवतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.’

एकनाथ शिदेंचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केलं जाणार होतं; संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप

“किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” ल्हानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्‍यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो ! ल्हानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टाॅकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची श्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.

IB Bharti 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, पगार 69 हजार

…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘ॲंग्री यंग मॅन’ मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुनावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !

Supriya Sule : ‘फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढते…’

…पन खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत ! तोच ‘ॲंग्री यंग मॅन’ वैयक्तीक आयुष्यात व्यवस्थेला शरण जानारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवनारा हा ‘शहेनशाह’ बघून वाईट वाटायला लागलं… पुर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी ‘चुप्पी साधलेला’ बघून आश्चर्य वाटायला लागलं… कुनाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करन्याची पोस्ट करनारा… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसनारा… केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली..

https://youtu.be/_GixPkoXMj0?si=yUYSiMBX1ZBWYdqg

…पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम… ❤- किरण माने.’ असं म्हणत त्याने त्याच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

follow us