IB Bharti 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, पगार 69 हजार

Intelligence Bureau Bharti 2023: भारतीय गुप्तचर संस्थेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. गुप्तचर विभागाने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिर केली आहे. या भरती अंतर्गत, सुरक्षा सहाय्यक/मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबद्दल माहिती जाणून घेऊया.
‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही प्रकारे आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवार 14 ऑक्टोबर 2023 पासून खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा, दहावी, बारावी व शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे सादर करावी.
पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफ.
एकूण पदांची संख्या- 677
शैक्षणिक पात्रता –
10वी उत्तीर्ण उमेदवार सिक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफ भर्तीसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पूर्ण केलेले असावे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर.
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
या पदभरतीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. त्याची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर
अधिकृत वेबसाइट – http://www.mha.gov.in
पगार –
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक – 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये.
मल्टी टास्किंग कर्मचारी – रु. 18 हजार 700 ते रु. 56 हजार 900.
जाहिरात –
https://drive.google.com/file/d/16qVMI5bKpiPBXQWH9Z7TAXmgbFYzDv9W/view