Amrita Fadnavis on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस जसे चर्चेत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी नुकतीच सन मराठी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली (Amrita Fadnavis ) या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होते आहे.
जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?
३५ पुरणपोळ्या खायचे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळेही कायमच चर्चेचा विषय ठरतात. आता अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतं आहे. या आधी अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका वेळी ३५ पुरणपोळ्या खायचे असं म्हटलं होतं. महाराष्ट्रभरात त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली होती. आता अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे.
खाजगी क्षेत्रातील आरक्षण विधेयकाला स्थगिती; प्रचंड विरोधानंतर कर्नाटक सरकारचा यु टर्न!
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्यासमोर येतात, जातात. दिसतात रोज पण त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही. धरण उशाला असतं आणि कोरड घशाला. असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर सोनाली कुलकर्णीने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? त्यावर अमृता फडणवीस चटकन म्हणाल्या, नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहे, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
कायम चर्चेत
देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने होणारी टीका. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, शिवाजी महाराजांचा राजकोटचा कोसळलेला पुतळा असो, बदलापूरचं प्रकरण असो देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक लगेच तुटून पडतात. अशातच आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान हे वक्तव्य केलं आहे ज्याची चर्चा होते आहे. #AmrutaFadnavis #अमृताफडणवीस pic.twitter.com/v0UDD57FUi
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 10, 2024