Drama Junior च्या सेटवर अमृता आणि संकर्षणची जमली मैफिल!

Drama Junior या कार्यक्रमाचे जज बनलेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांची ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय

Drama Junior च्या सेटवर अमृता आणि संकर्षणची जमली मैफिल!

Drama Junior

Amruta Khanvilkar and Sankarshan Karhade fun at Drama Junior : अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हे दोघे ड्रामा ज्युनियर (Drama Junior) या कार्यक्रमाचे जज बनले आहेत. या दोघांची ही ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय. अमृताने नुकताच तिच्या सोशल मीडियावर याच मस्तीचा एक भन्नाट रिल शेअर केला आहे.

शेतकरी, महिलांसाठी अजित पवारांकडून मोठ्या घोषणा, एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण अर्थसंकल्प

अमृता आणि संकर्षण ही जोडी पहिल्यांदा जज करताना दिसतेय आणि त्यांची ही धमाल मस्ती त्यांचा सोशल मीडिया वरून बघायला मिळत असते अश्यातच अमृता ने संकर्षण सोबत हा कमालीचा रील पोस्ट करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. व्हिडिओ मध्ये संकर्षण त्याचा कविता मोड मध्ये रमलेला आहे आणि अमृताने यावर त्याला एक विशेष टिप्पणी दिली आहे.

ज्युनियर च्या ड्रामा मध्ये या दोघांचा खरा ड्रामा देखील प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय. अमृता कायम तिच्या सोशल मीडिया वरून तिच्या नवनवीन कामाचे अपडेट्स देत असते आणि ती असा भन्नाट कंटेंट सोशल मीडिया वर नेहमीच शेयर करते. कामाच्या आघाडीवर अमृता सध्या 36 डे या आगामी सीरिज च्या प्रमोशन मध्ये व्यस्त असून येणाऱ्या काळात अनेक दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

पंढरीच्या वारीला मिळणार ग्लोबल टच; अजितदादांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अमृता बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतेय.अमृताने 2024 ची सुरुवात बॉलिवुड पासून केली असून लवकरच ती 36 डे मध्ये अनेक बॉलिवुड कलाकाराच्या सोबतीने दिसणार आहे. ” कलावती , ललिता बाबर ” आणि अनेक दर्जेदार चित्रपट घेऊन ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version