पंढरीच्या वारीला मिळणार ग्लोबल टच; अजितदादांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पंढरीच्या वारीला मिळणार ग्लोबल टच; अजितदादांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Assembly Session : अवघ्या महाराष्ट्राला वेध लागले आहेत (Maharashtra Assembly Session) ते आता पंढरीच्या वारीचे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. संतश्रेष्ठांच्या पालख्यांनीही पंढरीची वाट धरली आहे. यातच या वारीचं महात्म्य जगभरात पोहोचावं याची तयारी राज्य सरकारने केली आहे. यासाठीच आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात पंढरीची वारी आणि वारकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. राज्यातील वारकऱ्यांसाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा जयघोष करण्यात आला.

अजित पवार म्हणाले, वैष्णवांच्या दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. महाराष्ट्राच्या या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांची भक्तीमार्गाशी नाळ जोडली गेली आहे याची जाणीव सरकारला आहे. आता राज्याची ओळख असलेल्या पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.

Maharashtra Budget : महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा, अनेक नव्या योजना सुरू करणार

वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार

वारी आणि वारकऱ्यांसाठी आणखीही काही घोषणा अजित पवार यांनी यावेळी केल्या. निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, देहू आळंदी पंढरपूर मार्गावरील वारकरऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे. प्रतिदिंडी 20 हजार रुपये निधी देणार आहोत असे अजित पवार यांनी सांगितले. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, बस प्रवासात सवलत, शक्ती सदन योजना अशा योजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करत प्रत्येक पात्र कुटुंबियांना 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतमाल साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम योजना राबवणार. यात नवीन गोदामे आणि आधीच्या गोदामांची दुरुस्ती केली जाणार. यासाठी 341 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिकांच्या किंमतीत घसरण झाली. आता कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

‘..तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल’ अजित पवार गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा

बुलढाणा जिल्ह्यात नवीन आयुर्वेदिक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार असल्याच अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज