Download App

अमृताचं विलक्षण नृत्य! संगीत मानापमानमध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं “वंदन हो” गाणं

Amruta Khanvilkar Dance In Sangeet Manapman Movie : मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्सिंग स्टारसपैकी एक असलेल्या अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) डान्सचे चाहते कमी नाहीत. तिच्या लावण्या असो किंवा रिऍलिटी शोमधले सादरीकरण. अभिनेत्रीसह अमृता एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. त्यामुळे तिने सादर केलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. अमृताने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ह्यावेळी सुद्धा सुबोध भावे दिग्दर्शित आगामी ‘संगीत मानापमान’ चित्रपटात (Sangeet Manapman Movie) ती पुन्हा एकदा आपली कला सादर करणार आहे.

सिनेमात असलेलं सुरेख गाणं ‘वंदन हो’मध्ये आपण अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar Movie) सेमी क्लासिकल डान्स करताना पाहू शकतो. अमृता ही शास्त्रीय नृत्य करण्यात माहीर आहे. तिने खूपच मोहमयी नजाकतीने ह्या गाण्यात नृत्य केलंय. ट्रेलरमध्ये तिची एक झलक पाहूनच तिचे चाहते खूप उत्सुक होते. तिची अदा पाहून सर्वेच तिच्यावर फिदा होतात, ह्यात काही शंका नाही. चित्रपटातील ‘वंदन हो’ ह्या गाण्याला आणखी सुरेख कोरिओग्राफर दीपाली विचारे ह्यांनी बनवलं. मध्यप्रदेशच्या ओरछा येथे हे संपूर्ण गाणं दोन दिवसांत शूट झालंय.

“मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो”, काँग्रेस नेत्याचा दावा

अमृताने वंदन हो गाण्याबद्दल आपलं मत मांडताना सांगितलं की, ‘वंदन हो’ हे माझं गाणं संगीत मानापमानची भव्यता उत्तम प्रकारे कॅप्चर करतं. हे गाणं एक व्हिज्युअल ट्रीट आहे. माझ्या आणि दीपाली विचारे आम्हा दोघांचा उत्कृष्ट असा सुपरहिट गाण्याचा इतिहास (Marathi Movie) आहे. कारण, तिने चंद्रमुखी मधील चंद्रा देखील कोरिओग्राफ केलंय. जे 3 ते 4 वर्षानंतर देखील गाजतंय. पुढे ही गाजणार आणि आता मानापमान सारख्या संगीतमय चित्रपटामुळे मला दीपा ताईच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळालंय, ती कथ्थकची उस्ताद आहे. तिने जे वंदन हो गाण्यामध्ये केलय ते पूर्णपणे आश्चर्यकारक आहे. गाण्यात मध्य प्रदेशातील सुंदर लोकेशन आणि आम्ही चित्रित केलेला राजवाडा अगदी थक्क करणारा आहे. नचिकेत बर्वेनी गाण्याचे कॉस्ट्यूम अप्रतिम डिझाईन केलेत. तसेच गाण्याचे सिनेमॅटोग्राफर सुधीर भालानी ह्यांनी सुद्धा कायम लक्षात राहील असं काम केलंय.

चित्रपटाविषयी बोलताना अमृता म्हणाली की, संगीत मानापमानचा भाग होणे. शंकर एहसान लॉयच्या म्युझिक साठी सोलो परफॉर्म करणे म्हणजे कट्यार काळजात घुसलीच्या सर्व आश्चर्यकारक आणि अद्भुत आठवणी परत (Entertainment News) आणते. तीच टीम आहे. सुबोध कट्यारनंतर पुन्हा दिग्दर्शन करत आहे. त्याने मला ह्या चित्रपटासाठी विचारलं, ज्यात तो केवळ दिग्दर्शनच नाही तर त्यात अभिनय देखील करत आहे, त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी अद्भुत, खास आणि हृदयाच्या जवळ आहे. त्यात जिओ स्टुडिओज सिनेमा प्रोड्युस करत असल्यामुळे माझा गेस्ट अपिअरन्स आणखी स्पेशल झालाय.

‘बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान’ चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’तारखेला होणार प्रदर्शित

इतकंच नव्हे तर दिग्दर्शक, अभिनेता आणि खास मित्र सुबोध बद्दल सुद्धा अमृताने सांगितलं की, सुबोध मला त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम करण्याबद्दल विचारतो, तेव्हा मी कधीच नाही म्हणू शकत नाही. कारण त्याने मला सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी कट्यार काळजात घुसली दिलं होतं, जो सर्वात उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. त्याचं आणि माझा बॉण्ड घट्ट आहे. तो मला नेहमी असं काम देतो, जे माझ्या करिअरसाठी नक्कीच एक पाऊल पुढे असतं.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे, तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ 10 जानेवारी 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

 

follow us