राहा तयार! लवकरच येतोय ‘एप्रिल मे ९९’, रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण

राहा तयार! लवकरच येतोय ‘एप्रिल मे ९९’, रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण

Entertainment News : नवीन वर्षात मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवीन वर्षात (Happy New Year 2025) मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघेही एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.

राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की आहे. या चित्रपटात नेमकं काय असणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube