Amruta Khanvilkar : आपल्या अभिनयासह नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) अमृता आता हिंदीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अमृताची डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लुटेरे ( Lootere ) ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसल मेहता यांची ही वेब सिरीज असून जय मेहता यांनी ती दिग्दर्शित केली आहे. त्यानिमित्त लेट्सअप मराठीने अमृताची खास संवाद साधला यावेळी तिने या सिरीजच्या शूटिंग दरम्यान चा दक्षिण आफ्रिकेमध्ये तिच्यासोबत घडलेला एक थरारक प्रसंग सांगितला.
तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेता लवकरच करणार OTTवर पदार्पण, जाणून घ्या डिटेल्स
अमृताने म्हणाली की, कोरोनानंतर आम्ही या सिरीजचं शूटिंग केलं. कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण झालेलं होतं. तसेच ते दक्षिण आफ्रिकेतही होतं. अनेक लोकांच्या हाताची काम गेली होती, पैसे नव्हते. अशावेळी आम्ही एका अशा भागामध्ये शूटिंग करत होतो. जिथे एक झोपडपट्टीचा परिसर होता किंवा गुंड वगैरे लोक असण्याची शक्यता होती.
त्यावेळी शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला एका व्हॅनमधून लोकेशनवर घेऊन जाण्यात आलं. तेव्हा गरम होत असल्याने मी व्हॅनचा दरवाजा उघडला. मात्र त्यावेळी प्रोडक्शन टीममधून एक जणाने धावत येऊन मला सांगितलं की, अशाप्रकारे दरवाजा उघडू नका. नाहीतर कोणीतरी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला कळणार देखील नाही. त्यामुळे सगळं बंद करून ठेवा हा भारत नाही.
सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’
कारण आम्ही जिथे शूटिंग करत होतो. तेथे कुणाचा तरी खून झाला होता. अशा प्रकारच्या तणावग्रस्त परिस्थितीत आम्ही शूटिंग केलं. त्यावेळी आमचं शूटिंगचे सामान देखील लुटलं गेलं होतं. तसेच शूटिंग शेड्युल लागल्यानंतर देखील अनेकदा काही समस्या आल्यानंतर आमचं शूटिंग पाच-पाच दिवस थांबलो होतो. त्यावेळी आम्ही हॉटेलवरच राहत होतो. अशा सर्व परिस्थितीमध्ये तब्बल आठ महिने शूटिंग चालल त्यानंतर आता दीड दोन वर्षानंतर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असं म्हणत अमृताने लुटेरे या वेब सिरीजचा तिचा दक्षिण आफ्रिकेतील शूटिंग दरम्यानचा थरारक अनुभव शेअर केला आहे.