Download App

सातासमुद्रापार अमृताच्या नृत्याविष्काराचा डंका! सुंदरी ऑन ग्लोबल स्टेज…

Amruta Khanvilkar USA Tour Sundari Dance Performance : फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruita Khanvilkar). तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. सध्या अमृता जगभरात प्रवास करताना देखील (Entertainment News) दिसतेय. नुकतीच ती USA टूर वर गेली आहे. पण हा फक्त प्रवास नाही, तर ही टूर तिच्या अगदी मना जवळची आहे. याचं कारण देखील तितकंच खास आहे.

अमृताच नृत्य कौशल्य अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. आजही तिच्या अदाकारी परॉर्मन्सवर चाहते तितकेच खुश होताना बघायला मिळतंय. अगदी लावणीपासून क्लासिकल नृत्यापर्यंत अमृताने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे.

नाशिकनंतर पुण्यातही खळबळ! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढा अडचणीत; आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

‘सुंदरी’ हा सदाबहार नृत्यप्रयोग (Sundari Dance) परफॉर्म करण्यासाठी अमृता या खास USA टूर वर आहे. विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी आहे. या खास टूरमध्ये ती स्वतःच्या आवडीचा खास नृत्याविष्कार यात सादर करताना दिसते. या बद्दल बोलताना अमृता सांगते, पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत’सुंदरी’सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आशिषच्या ( Nritya Aashish Sundari ) नृत्य आशिष सुंदरीचा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे. लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय, याचा आनंद तर आहे. पण ही कला, स्त्रीत्व, आणि संस्कृतीची सुंदर गोष्ट आता परदेशात मराठी माणसांसाठी सादर होते आहे, याचा खूप अभिमान देखील आहे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? तिजोरीत भीषण खडखडाट, 23 अब्ज डॉलर्सचं कर्ज न फेडल्यास…

संस्कृतीची सीमारेषा ओलांडणारा हा सोहळा साता समुद्रापार घडतोय, याहून वेगळं सुख काय असणार. मराठी प्रेक्षक परदेशात सुद्धा तितकंच प्रेम देतात, हे बघून भारावून जायला होतंय. एका अर्थाने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परदेशात देखील तितकीच प्रेम मिळवते, याचा सगळ्यांना अभिमान आहे यात शंका नाही. येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला तर येणार आहे. प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे.

 

follow us