Download App

Amruta Khanvilkar दिसणार नव्या रूपात; पुन्हा छोट्या पडद्यावर करणार कम बॅक!

Amruta Khanvilkar ने 2024 वर्षाची सुरुवात दमदार केली. ती एका मागोमाग एक अश्या कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली.

Amruta Khanvilkar will come back on Small Screen : 2024 वर्षाची सुरुवात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) दमदार केली. ती एका मागोमाग एक अश्या कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली. ” लुटेरे , चाचा विधायक है हमारे 3 , 36 डे ” अश्या भन्नाट प्रोजेक्ट्स नंतर ती आता झी मराठीच्या आगामी कार्यक्रमात झळकणार आहे. बॅक टू बॅक वेगवेगळ्या रूपात ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना तिच्या सोशल मीडिया वरच्या रिलने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Team India : जुन्या संघात जुनेच भिडू, टीम इंडियाला धक्का की विजय पक्का?

कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अमृता आता नक्की काय करणार आहे ती मालिका करणार की रियालिटी शो अश्या अनेक चर्चांना उधाण आल आहे लवकरच या बद्दल प्रेक्षकांना समजेल असं देखील कळतंय. वेब शो, चित्रपट आणि आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या बद्दल ती खूप उत्सुक असल्याचं कळतंय.

बालेकिल्ल्यातच पिछेहाट! भाजपला सर्वाधिक टोचणार ‘या’ मतदारसंघातील काँग्रेसचा विजय

नव्या प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडिया वर रील पोस्ट करत अमृता म्हणते ” नव्या रंगात नव्या ढंगात कमिंग सून ” ! आता नेमका हा प्रोजेक्ट काय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. अमृता ग्लॅमरस स्टार म्हणून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे आणि आता तिच्या या पोस्ट ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडिया वर सक्रिय राहून ती कायम तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल प्रेक्षकांना हिंट देत असते आणि आता हा नवा प्रोजेक्ट घेऊन पुन्हा एकदा ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.या नव्या प्रोजेक्ट सोबत अमृता येणाऱ्या काळात ” कलावती , ललिता बाबर , पठ्ठे बापूराव ” अश्या चित्रपटात दिसणार आहे.

follow us