Animal Box Office Collection Day 8: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट गेल्या 8 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि आठ दिवसांत या चित्रपटाने देशात 361 कोटींहून अधिकचा गल्ला कमावला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत अॅनिमलने 600. 67 कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केले आहे. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची गती कायम राहिली तर तो लवकरच जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे.
विकी कौशलच्या ‘साम बहादूर’सोबत ‘अॅनिमल’ 1 डिसेंबरला रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपटांच्या कथा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. प्रेक्षकांना विकी कौशलचा चित्रपटही खूप आवडतो, पण बॉक्स ऑफिसवर त्या चित्रपटाचे कलेक्शन अॅनिमलच्या तुलनेत खूपच कमी आहे. अॅनिमलने पहिल्याच दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. जे ओपनिंग डे साठी खूप जास्त आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरत आहे. बॉबी देओलचेही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.
चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 66.27 कोटी होते. जे पहिल्या दिवसापेक्षा जास्त आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. चित्रपटाने 7.83 टक्के वाढीसह 71.46 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 38.48 टक्के घट झाली आणि एकूण कलेक्शन 43.96 कोटी रुपये झाले.
Sonu Nigam: ‘सुन जरा..’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? चोरीच्या आरोपावरून नव्या वादाला फुटलं तोंड
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पाचव्या दिवशी आणखी 14 टक्के घट झाली आणि दिवसअखेर 37.47 कोटी रुपयांची कमाई झाली. यानंतर चित्रपटाने सहाव्या दिवशी 30.39 कोटींचा, सातव्या दिवशी 24.23 कोटींचा व्यवसाय केला आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी 23.50 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 361.80 कोटींवर पोहोचले आहे.
संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, प्रेम चोप्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.