Sonu Nigam: ‘सुन जरा..’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? चोरीच्या आरोपावरून नव्या वादाला फुटलं तोंड

Sonu Nigam: ‘सुन जरा..’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? चोरीच्या आरोपावरून नव्या वादाला फुटलं तोंड

Sonu Nigam: सोनू निगम (Sonu Nigam) हा बॉलिवूडमधील (Bollywood) अत्यंत प्रतिभावान गायक आहे. 90 आणि 2000 चं दशक सोनूने जोरदार गाजवलं. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळालं. (Singer ) चित्रपटात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो. आता पाकिस्तानी गायक आणि गीतकार ओमेर नदीमने (Omer Nadeem) त्यांच्यावर गाण्याची कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला.

सोनू निगमच्या गाण्याचे शीर्षक ‘सुन जरा’ आहे, जे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर (YouTube channel) 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले आहे. अलीकडेच ओमेर नदीमने या गाण्याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून सोनू निगमचे हे गाणे त्याच्या ‘ए खुदा’ या गाण्यावरून कॉपी केले असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले ओमिर नदीम?

ओमेर नदीमने व्हिडीओमध्ये त्याच्या आणि सोनू निगमच्या दोन्ही गाण्याच्या क्लिप शेअर करून हा आरोप केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ओमेरने लिहिले की, “मी माझ्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला या गोष्टींची अजिबात काळजी नाही. पण हो, तुम्ही हे करत असाल तर निदान मूळ ट्रॅकला तरी श्रेय द्या. आणि जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर ते हुशारीने करा. मी सोनू निगमचा खूप मोठा चाहता आहे.

Toxic Title Teaser: हातात बंदूक अन् तोंडात सिगारेट; यशच्या ‘टॉक्सिक’चा टायटल टीझर आऊट

ओमेरचे गाणे कधी आले?

ओमेरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे की, त्याचे हे गाणे 2009 मध्ये रिलीज झाले होते. त्याच्या गाण्याला यूट्यूबवर 5 लाख 40 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. सोनू- निगमबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या गाण्याला 24 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोनूने या गाण्याला आवाज दिला आहे, तर त्याचे बोल अभिनेता-चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके यांनी लिहिले आहेत आणि संगीत डीजे शेझवुडने दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube