Singer Mika Singh And Rakhi Sawant: ‘त्या’ चुंबनासाठी दाखल केलेला गुन्हा रद्द करा! गायक मिका सिंगने कोर्टात घेतली धाव
Singer Mika Singh And Rakhi Sawant: बॉलिवूड गायक मिका सिंग (Singer Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात २००६ मध्ये झालेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसून येत आहे. राखी सावंतने दाखल केलेली विनयभंगाची तक्रार रद्द करण्यासाठी गायक मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. या १७ वर्षे जुने प्रकरण रद्द करायचे आहे. मिकाने बळजबरीने किस केल्याचा आरोप मिका सिंगवर करण्यात आला होता.
मिकाच्या वकिलाचे म्हणणे आहे की गायकाने आणि राखीने हे प्रकरण सामंजस्याने मिटवले आहे. यामुळे आता हे प्रकरण कोर्टातून रद्द व्हायला हवे. मिका सिंगने २००६ साली राखी सावंतला वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय सर्वांसमोर किस केले होते. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी १० एप्रिल रोजी मिका सिंगचे वकील सुनावणीसाठी आले होते.
राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, राखी तिच्या कामात व्यस्थ आहे. मात्र दोघांनी वाद मिटवला असल्याची माहिती वकिलांनी सांगितली. यामुळे तिने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास हरकत नाही. दुसरीकडे, राखीच्या वकिलांनीही न्यायालयाला सांगितले की, एफआयआर रद्द करण्याच्या संमतीसंबंधीचे प्रतिज्ञापत्र मागवण्यात आले होते.
Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले
परंतु ते उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागामधून गायब झाले आहे. त्यामुळे त्याचा शोध घेता आला नाही. त्यानंतर खंडपीठाने त्यांना पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर, गायक मिका सिंगच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, हे प्रकरण गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे.
मिका सिंगवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र आरोप निश्चित व्हायचे आहेत. मिका सिंग आणि राखी सावंत हे प्रकरण विसरले आहेत. यामुळे हे प्रकरण रद्द करण्यात यावे.
Salman Khan: ‘या तारखेला तुला मारणार’; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
काय आहे नेमकं प्रकरण?
२००६ मध्ये मिका सिंगने राखी सावंतला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय किस केले होते. यानंतर राखी सावंतने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आणि नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.