Box Office Collection: ‘अॅनिमल’ची 500 कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ चार चित्रपटांना टाकलं मागे
Animal Worldwide Box Office Collection Day 6: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाचा फिव्हर केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे. या क्राईम थ्रिलरची प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. सोबतच ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहते मोठी गर्दी करत आहेत.
अशा परिस्थितीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. सर्व रेकॉर्ड मोडण्यासोबतच ‘अॅनिमल’ने रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांत जगभरात आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे.
View this post on Instagram
‘अॅनिम’ची जगभरातील कमाई?
‘अॅनिमल’ सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला बघायला मिळत आहे. या चित्रपटाने अतिशय वेगाने कमाई करत सर्वांनाच धक्का दिला आहे. ‘अॅनिमल’ रिलीज होऊन अवघे 6 दिवस झाले असून या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, याने 520 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हे जगभरातील अॅनिमल चित्रपटाची आकडेवारी आहे.
पहिल्या दिवशी ‘अॅनिमल’ने जगभरात 116 कोटींहून अधिकची ओपनिंग केली होती. या चित्रपटाची दुस-या दिवशी जगभरात 120 कोटींची कमाई झाली आहे. ‘अॅनिमल’ने तिसऱ्या दिवशी जगभरात 120 कोटींची कमाई केली. ‘अॅनिमल’ची वर्ल्डवाइड कमाई चौथ्या दिवशी 69 कोटी रुपये झाली. पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ‘अॅनिमल’ने जगभरात 56 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सहाव्या दिवशी ‘अॅनिमल’चे जगभरातील कलेक्शन 527.6 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Konkan Mahotasv : 11 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
‘अॅनिमल’ने 300 कोटींचा टप्पा ओलांडला
‘अॅनिमल’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी देशांतर्गत बाजारातही इतिहास रचला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 30 कोटींचा गल्ला जमवून 300 कोटींचा आकडा पार केला आहे. देशातील सर्व भाषांमध्ये ‘अॅनिमल’ने एकूण 6 दिवसांचे आता 312.96 कोटी झाले आहे. सोबतच या चित्रपटाने टायगर 3 च्या कलेक्शनचा रेकॉर्डही मोडला आहे.
या चित्रपटाने सहाव्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये जवान 24 कोटी, पठाण 25.5 कोटी आणि बाहुबली 2 26 कोटीचे रेकॉर्डही मोडीत काढले आहेत.चित्रपट गदर 2 च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शन 32.37 मागे सोडू शकला नाही. ‘अॅनिमल’ ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच देशांतर्गत आणि जगभरातील शाहरुख खानच्या जवान आणि पठाणच्या कलेक्शनला मागे टाकेल, असे बोलले जात आहे.