Download App

Animal : बुर्ज खलिफावर झळकला ‘अ‍ॅनिमल’; रणबीर कपूरसह प्रिमियरला कलाकरांची हजेरी

  • Written By: Last Updated:

Animal : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal) या चित्रपट गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत आला आहे. त्यात आता शाहरूखच्या पठाणनंतर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर जगातील सर्वांत उंच इमारत दूबईतील बुर्ज खलिफावर रिलीज करण्यात आला. यावेळी अभिनेता रणबीर कपूरसह इतर अनेक कलाकारांनी या टीझर प्रदर्शनाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत काय घडलं? संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं

यावेळी रणबीर कपूर, बॉबी देओल, निर्माते भूषण कुमार यांच्यासह इतर अनेक कलाकार दूबई सेंटरच्या स्टेजवर पोहचले होते. तर त्यानंतर शिव चन्ना आणि प्रणय रेडी वांगा यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर रणबीर कपूरच्या ॲनिमल चा टीचर रिलीज करण्यात आला.

उदयनराजेंनी मीडियासमोरच हात जोडले! म्हणाले, ‘नाहीतर देशाची वाट लागेल…’

या अगोदर ॲनिमल चित्रपटाच्या टिझरने टाइम्स स्क्वेअरवर देखील धुमाकूळ घातला होता. अमेरिकेमध्ये देखील या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अॅनिमल हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

अॅनिमल हा रणबीर कपूरचा आंतरराष्ट्रीय बाजारात, विशेषत: यूएसएमध्‍ये 888 हून अधिक स्‍क्रीनवर रिलीज करण्यात येणार आहे. यामध्ये रणबीरच्या राऊडी लूक बघायला मिळत आहे. त्याच्या डोळ्याला गॉगल दिसत असून अभिनेत्याच्या तोंडामध्ये सिगारेटही पाहायला मिळत आहे. सिनेमातील अभिनेत्याच्या बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Tags

follow us