Maratha Reservation:जातीनिहाय जनगणना करा आणि ज्यांना आरक्षण हवंय…; उदयराजेंनी हातच जोडले!
Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून राज्यात मराठा-ओबीसी (Maratha) संघर्ष पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या विरोधात सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकवटले. अशातच जरागेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्याचं स्वागत केलं. राज्यातील सद्यस्थिती पाहून त्यांना माध्यमांसमोरच हात जोडले आणि कळकळीचं आव्हानं केलं.
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?
जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज उदयनराजे भोसलेंची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले की, मनोज जरांगेंना एवढेच सांगेन की, तुमचं कुटुंब आहे. त्यांना तुमची गरज आहे. त्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे. माध्यमांच्या लोकांनी विचार करायला हवा की, एक व्यक्ती एवढ करू शकतो, पण का… तर त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी मराठा म्हणून बोलत नाही, पण मनोज जरांगेंची जी मानसिकता झाली, ती सर्वांची झाली. मेरीटच्या आधारावर आरक्षणाचा लाभ द्यावा असं मला वाटतं, असं उदयनराजे म्हणाले.
प्रश्न सुटणार नसतील तर जगायचे कसे? जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत मार्ग निघणार नाही. प्रत्येकाला कुटुंब आहे, मुले आहेत, त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची वेळ आली की आरक्षणाचा प्रश्न येतो. जातीनिहाय जनगणना करा आणि ज्यांना आरक्षण हवे आहे त्यांना आरक्षण द्या, असं उदयनराजे म्हणाले.
जखमी महिला पोलिसांची दखलही घेतली नाही, जाऊन विचारा काय झालं…; भुजबळांनी चाकणकरांना फटकारलं
प्रत्येकाला जगण्याचा आणि चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जातीचे राजकारण सोडा. महाराजांनी कोणालाच अंतर दिले नाही. महाराजांचे विचार आचरणात आणा आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षण द्या, अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली.
दीडशे मराठ्यांचे आमदार पाडू, असं ओबीसी नेते म्हणत आहेत. याविषयी विचारलं असता उदयराजेंनी मीडियासमोरच होत जोडले. ते म्हणाले, कोणाला पाडायचं असेल ते पाडा. मी तर निवडणूक लढवणार नाही. पण, प्रत्येकाने मनापासून विचार केला पाहिजे… जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करू नका. या देशाचे तुकटे करू नका. नाहीतर या देशाची वाट लागेल, असे उदयनराजे यांनी हात जोडून आवाहन केले.