Anupama will be playing with new changes, what exactly did Rupali Ganguly say : प्रसिद्ध टीव्ही वाहिनी स्टार प्लसचा प्रसिद्ध शो म्हणजे अनुपमा ज्या पद्धतीने कठोरपणा स्वप्न आणि स्वतःची ओळख निर्माण करणे अशी सगळी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ती मालिकेची नायिका रूपाली गांगुली जी अनुपमा हे पात्र अगदी साध्या आणि सहज पद्धतीने साकारते. ज्याप्रमाणे मालिकेमध्ये ती एक गृहिणी पत्नी आई आहे त्याचप्रमाणे ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील याच भूमिका अगदी योग्य पद्धतीने निभावते.
हिना खान रॉकी जयस्वालसोबत विवाहबद्ध; खास फोटो शेअर करत दिली गुडन्युज!
यावर बोलताना रूपाली गांगुली म्हणते की, एका आईसाठी तिचं कुटुंब आणि तिची मुलं हे सर्वात आधी असतात. हे माझ्यासोबतही झालं आई होण्याचं सुख अनमोल असतं. त्यामुळे मी माझ्या मुलगा रुद्रांश बालपण छान पद्धतीने जगावं असं मला वाटत होतं. तेच माझं जग होतं माझा परिवार आणि हे सर्व गोष्टींमध्ये मी समाधानी होते मात्र अनुपमा माझ्या जीवनात आली आणि माझ्यातील अभिनेत्री तिने जागी केली.
ज्याप्रमाणे एखाद्या महिलेला तिचा पती आणि तिची मुलं हे मोठा आधार असतात. त्याचप्रमाणे माझ्यासाठी देखील अश्विनी आणि रुद्रांश हे माझी ताकद होते. त्यांच्यामुळेच मी मोठ्या पडद्यावर येऊ शकले या दोघांनीच मला अनुपमा हे पात्र साकारण्याची हिंमत दिली. त्यानंतर आता अनुपमा चा एक नवा प्रवास मी सुरू करत आहे. ज्यामध्ये मी स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. हा प्रवास आमची कर्मभूमी आणि माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्वतःवर प्रेम करायला अनुपमा शिकणार आहे. तरी देखील ती स्वार्थी बनणार नाही. या मालिकेत हा आलेल्या ट्विस्ट अनेकांना पुढील रस्ता संपल्याचे दाखवत होता. मात्र यानंतर अनुपमाच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू झाला आहे.