Download App

Aparshakti Khurana घेऊन आला नव गाणं; ‘बरबाद’ चं झालं अनावरण

Aparshakti Khurana : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अगोदर त्याचे ‘कुडिये नी’, ‘होर कोई नहीं’, ‘तेरा नाम सुनके’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘बरबाद’ या नव्या गाण्याचं अनावरण त्याने केल आहे.

“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

अपारशक्ती एक बहुवलयंकित कलाकार आहे. तो अभिनेता, रेडिओ जॉकी, संगीतकार आहे. अपारशक्ती खुराना याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की, बरबाद या रोमांचक गाण्याचं अनावरण. हरवून जा या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यामध्ये. हे गाणं निर्माण यांनी लिहिलं आणि त्याला संगीत दिले आहे. निर्माण हे ते त्यांच्या मैं वेखाँ तेरी फोटो’ या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे गाणं रिलीज होताच चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट केल्या आहेत.

हिंगोलीत ऑल इज नॉट वेल! “उमेदवार बदला, अजून वेळ आहे”; हेमंत पाटलांना भाजपाचा विरोध

अपारशक्ती खुरानाने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला आरजे म्हणून काम केलं. त्यानंतर सुत्रसंचालनही केलं. तर आमीर खानच्या दंगल चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर त्याच्या अभिनयाच्या करीअरला वेग आला. त्याने आलिया वरूणच्या बद्रीनाथ की, दुल्हनिया या चित्रपटात काम केले आहे. तसेच आता तो बब्बू की बारातमध्ये दिसणार आहे.

चित्रपटांच्या आघाडीवर, अपारशक्ती ‘स्त्री 2’ मध्ये त्याच्या प्रिय पात्र ‘बिट्टू’ चे पुनरुत्थान करताना दिसणार आहे, तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बर्लिन’लाही त्याचे श्रेय दिले आहे, जे मुंबईत होणाऱ्या रेड लॉरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार आहे. 5-7 एप्रिल दरम्यान. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे ॲपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ हा डॉक्युमेंट्री देखील आहे.

follow us