Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा (Bigg Boss Marathi ) रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल (Arbaz Patel) सहभागी झाला होता. (BB Marathi) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने चाहत्यांना घायाळ केलं. (Bigg Boss Marathi Season 5) जिगरबाज तरुणाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता. निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला त्याचा प्रवास संपला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात (Bigg Boss Marathi New Promo) अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह (Nikki Tamboli) सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून प्रत्येक आठवड्याला कोणाला ना कोणाला बाहेर पडावं लागतं. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला,”महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती”.
सुप्रिया पिळगांवकर यांच्यात रंगली डान्सची जुगलबंदी
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची टीम म्हणजेच स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ घरात जाणार आहेत. आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा ताई आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे.
Bigg Boss Marathi: ‘अशा बॉडीचा उपयोग काय?’नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये डॉ. निलेश साबळे म्हणत आहे,”सुप्रिया ताई तुमचं गाणं लागेल तेव्हा वर्षा ताईंनी परफॉर्म करायचं. त्यानंतर सुप्रिया ताई आणि वर्षा ताई ‘घे पाऊल पुढे जरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पुढे डॉ. निलेश साबळे म्हणत आहे,”वर्षा ताईंचं गाणं लागेल तेव्हा सुप्रिया ताई डान्स करणार”. त्यानंतर “मी आले”, या गाण्यावर त्या थिरकताना दिसत आहेत.