Bigg Boss Marathi: ‘अशा बॉडीचा उपयोग काय?’ नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं

Bigg Boss Marathi: ‘अशा बॉडीचा उपयोग काय?’ नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं

Bigg Boss Marathi New Season 5 Sangram Chougule : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात वाईल्ड कार्डच्या (Wild Card) माध्यमातून संग्राम चौघुलेने (Sangram Chougule) एन्ट्री घेतली. (Bigg Boss Marathi ) त्याच्या येण्याने घरामधील खेळ पूर्ण बदलून जाईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. पण असं काहीही झाल्याचं बघायला मिळत नाहीये. इतकच नव्हे तर संग्रामच्या खेळावर सध्या प्रेक्षकांची नाराजी असल्याचं देखील बघायला मिळतंय. त्यातच अरबाजसोबतच्या (Arbaaz) लढतीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे संग्रामला सध्या कोणताच टास्क खेळण्याची परवानगी नसल्याचे दिसत आहे. यावरून संग्रामला सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केले जात आहे.


संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलच फैलावर घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने संग्रामच्या शरिराच्या बाबती एक महत्वाची पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टमध्ये सांगितले आहे की, बिग बॉसच्या कालच्या एपिसोडमधे एकेकाळी मिस्टर युनिवर्स वगैरे असलेल्या (आणि आजही उत्तम फिजिक असणाऱ्या) संग्राम चौगुलेची गेममधे असलेली अवस्था बघून मला आश्चर्य वाटले. फोटोत असलेली देहयष्टी असणारा धडधाकट आणि रांगडा संग्राम गेम सुरु झाल्यावर काही क्षणात धापा टाकायला लागतो….थकतो….खूप शक्ती आहे असं जाणवत नाही. काल जरा पडला तर लगेच फ्रॅक्चर झालं.

मग अशा बॉडीचा उपयोग काय? वरवर सिक्स पॅक्स वगैरे आणि आतून इतकी ठिसूळ, नबळी आणि कमकुवत बॉडी असेल तर काय अर्थ उरला? प्रोटिन शेक्स, जीम वगैरे करुन सरतेशेवटी ही अशी परिस्थिती होणार असेल तर काय अर्थ उरला? ॲनाबॉलिक स्टिरॉईड्स घेऊन जर तुमची देहयष्टी आतून इतकी नाजूक होते तर मग या शोऑफच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे? माझ्या मते शरिराच्या बाबतीत चपळाई, मध्यम वजन, उत्तम रोगप्रतिकारशक्ती, तंदुरुस्ती आणि चांगली उंची हे क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत. अशी पोस्ट करत संग्रामला ट्रोल केले जात आहे.

Bigg Boss Marathi: घरातील गाजलेली जोडी कोणती? स्वत: बिग बॉसनेच सांगितलं नाव

संग्रामच्या डाव्या हाताला दुखापत

संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संग्रामच्या काही वैद्यकीय चाचण्यादेखील करण्यात आल्या आहेत. त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताच्या दुखापतीबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही सहभाग घेता आला नसल्याचे पाहायला मिळाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube