Bigg Boss Marathi: घरातील गाजलेली जोडी कोणती? स्वत: बिग बॉसनेच सांगितलं नाव

Bigg Boss Marathi: घरातील गाजलेली जोडी कोणती? स्वत: बिग बॉसनेच सांगितलं नाव

Bigg Boss Marathi Season 5 Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच (Bigg Boss Marathi Season 5) कोणती ना कोणती जोडी गाजत असते. पण (Bigg Boss Marathi ) घरात सर्वाधिक गाजलेली जोडी निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाजची (Arbaz Patel) आहे. ‘बिग बॉस’ने स्वत: याची कबुली दिली आहे. तसेच या गाजलेल्या जोडीलाच ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला आहे. आता ही गाजलेली जोडी आणखी काय धमाका करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात, (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”पुढील जोडी आहे या घरात गाजलेली जोडी”. त्यानंतर घरातील सदस्य अभिजीत आणि निक्कीच असणार असा अंदाज बांधत आहेत. ‘बिग बॉस’देखील त्यांचच नाव घेत आहेत. अंकिता म्हणतेय,”गॅससाठी भांडताना ‘बिग बॉस’ने आग लावली आहे”. ‘बिग बॉस’ पुढे मला भूक लागली आहे या संघटनेच्या अध्यक्षा अंकिता”. दुसरीकडे ‘बिग बॉस’ जान्हवीला विचारत आहेत,”जान्हवी फळ खाताय? काकाकुवापण असचं फळ खातो”. जान्हवी पुढे म्हणते,”बिग बॉस माझ्यासमोर त्या प्राण्याचं नाव घेऊ नका”. त्यानंतर अंकिता आणि सूरज या जोडीमध्ये टाक्स रंगतो. अखिल भारतीय संचालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत सावंत हा जोडीचा संचालक असतो.

सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार?

घरात सध्या जंगल राग सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान वर्षा ताई आणि अरबाज यांचं वाजणार आहे. सर्व सदस्यांची धांडल उडणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi : पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक; पाहा प्रोमो

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, डीपी दादा भांडी वाजवत ‘बिग बॉस’ला गॅस सुरू करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर अंकिता गॅस सुरू करताना दिसत आहे. घड्याळ लावून घरातील काही सदस्य जेवण बनवताना दिसत आहेत. नंतर अरबाज म्हणतोय,”बिग बॉस’ गॅस बंद करा”. पुढे वर्षा ताई म्हणत आहेत,”राईचा पर्वत करायचाय उगाच”. अरबाज पुढे म्हणतोय,”फेकलं गरम पाणी तिकडे जाऊन”. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात डीपी दादा अभिजीतला म्हणत आहे,”हत्ती आणि गेंडा तू कधी पट्टापट्ट्याचा बघितला आहेस?”. त्यावर अभिजीत उत्तर देतो,”मी अंदाज बांधत होतो”. दरम्यान बिग बॉस अभिजीतला म्हणतात,”अभिजीत एक प्रश्न पडलाय. आपण व्हेज आहात की नॉन-व्हेज?”. शेवटी जान्हवी म्हणतेय,”काकाकुवा हा प्राणी मी शेवटपर्यंत विसरणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube