Download App

Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोकमामा झाले भावुक; नेमकं काय घडलं? पाहा…

  • Written By: Last Updated:

Sa Re Ga Ma Pa : ‘झी मराठी’(Zee Marathi) वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa ) नव्या पर्वाला चाहत्यांना जोरदार प्रतिसाद मिळतं आहे. या कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्सनं त्यांच्या आवाजाने चाहत्यांची नेहमी मनं जिंकली आहे. गेल्या आठवड्यामध्ये ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मंचावर अक्षरा (Social media) आणि अधिपतीची हळद, लग्न वगैरे बघायला मिळाल होतं.


यानंतर कार्यक्रमामध्ये मराठी सिनेसृष्टीतील मामा म्हणजेच चाहत्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हजेरी लावणार आहेत. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यामध्ये मामा लिटिल चॅम्प्सच्या एका कृतीमुळे चांगलाच भावुक झाल्याचं बघायला मिळालं आहे.

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या पर्वामध्ये परीक्षकाची भूमिका गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे सांभाळत आहेत. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमात मामा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडीओमध्ये, मामावर फुलांचा वर्षाव करत सर्व लिटिल चॅम्प्स त्यांचे आशीर्वाद घेत असल्याचे बघायला मिळाले आहे. हे प्रेम बघून मामा खूप भावूक झाल्याचं बघायला मिळाले आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यांनी लिहीलं आहे की, “खूप चांगलं उदाहरण आहे…म्हणतात ना इथेच करायचं आणि इथेच भोगायचं…हे फक्त वाईट हेतूने न घेता चांगल्या हेतूने पण घेता येत ते मामांनी सिद्ध करून दाखवलं आहे, म्हणजेच काय त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोच पावती आज या स्वरुपात मिळतं आहे.

DSP-Ajay Devgan: ‘दृश्यम २’ नंतर रॉकस्टार डीएसपी अन् अजय देवगण पुन्हा एकत्र

तर दुसऱ्या चाहत्यांनी लिहीलं आहे की, “माहित नाही काय जादू आहे या व्यक्तीमध्ये, यांना बघूनच मनात एक स्मित हास्य येतं. धन्य आहे आम्ही की सम्राट, विनोदाचे बादशहा माझे लहानपणापासूनचे सर्वाना आवडते, मामा या महाराष्ट्र राज्यात जन्माला आले. सध्या मामांची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. तसेच याअगोदरच्या ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या प्रोमोत बघायला मिळत आहे.

Tags

follow us