Ayushmann Khurrana Appeal for voting to Maharashtra Voters : अभिनेता आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना ( Ayushman Khurana ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन ( Voting awareness ) करत आहे. यावेळी त्याने पाचव्या टप्प्यामध्ये मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
BECIL मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 60 हजार रुपये पगार…
निवडणूक आयोगाने ( ECI ) मतदारांना आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुरानाची निवड केली आहे. या मोहिमेद्वारे आयुष्मान देशातील तरुणांना संसदेत आपल्या देशाचे पुढचे नेते निवडण्याचा अधिकार वापरण्याची विनंती करत आहे. यावेळी त्याने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने पाचव्या टप्प्यामध्ये मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Aapka vote aapki aawaz hai. Exercise your right to vote tomorrow in Maharashtra. Matdan apka farz hai.@ECISVEEP @SpokespersonECI @CEO_Maharashtra @MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/sRy1ViyP3i
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) May 19, 2024
आयुष्मान म्हणत आहे की, मित्रांनो मतदानाची वेळ आली आहे. देशात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यात आता तुमची वेळ आली आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. ज्याद्वारे तुम्ही देशाचा नेता निवडणार आहात. तुमचं मत तुमचा आवाज आहे. त्यामुळे मतदान करा आणि तुमचं मत गिनतीमध्ये आणा. कारण त्यातून आपण आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. मतदान करणं तुमचं कर्तव्य आहे. असं म्हणंत त्याने पाचव्या टप्प्यामध्ये मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
“पक्ष फुटला नसता तर मीच CM झालो असतो”; शरद पवारांचा दावा भुजबळांनी खोडला
आयुष्मान हा भारतासाठी युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत देखील आहे. तो सॉकर आयकॉन डेव्हिड बेकहॅम सह युनिसेफच्या EVAC (एन्डिंग व्हायोलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन) या जागतिक मोहिमेचा चेहरा देखील आहे. त्यानंतर आता देशाच्या आयोगाकडून आयुष्मान खुरानाची निवड मतदारांना आवाहन करण्यासाठी करण्यात आली आहे.