BECIL मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 60 हजार रुपये पगार…
BECIL Recruitment 2024 : आज बेरोजगारी इतकी वाढली आहे की, अनेकजण उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या (job) शोधात आहेत. दरम्यान, तुम्ही देखील उच्च शिक्षित असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बाती आहे. ती म्हणजे, नुकतीच ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे? या भरतीप्रक्रियेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख किती आहे? याच विषयी जाणून घेऊ.
पुण्यातील गंभीर घटना! रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला घेतला चावा; अंगठा तुटला
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत स्टार्ट-अप फेलो, यंग प्रोफेशनल आणि आयटी सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारींनी दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा. कारण, मुदतीनंतर अर्ज केल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा – 15 रिक्त जागा
पदांचा तपशील –
स्टार्ट-अप फेलो या पदाच्या एकूण चार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
तर आयटी सल्लागार पदाच्या एकूण एक रिक्त जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता-
स्टार्ट-अप फेलोच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तंत्रज्ञान/अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा कान्स फेस्टिव्हलमधला लूक
आयटी सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान/ माहिती विज्ञान/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स या विषयात B.E किंवा B.Tech चे शिक्षण असावे.
माहिती तंत्रज्ञान/ माहिती विज्ञान/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स या विषयामधील पाच वर्षाच्या अनुभवासह डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
UGC/AICTE/MCA मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान / माहितीशास्त्र/संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स मध्ये M.E. / M.Tech चे शिक्षण असणे आवश्यक आहे.
पगार
स्टार्ट-अप फेलोच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 रुपये वेतन दिले जाईल.
यंग प्रोफेशनल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये 60,000/- दिले जातील.
आयटी सल्लागार या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 33,000 ते रु. 44,000/- पर्यंत वेतन दिले जाईल.
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडची अधिकृत वेबसाइट –
https://www.besil.com/
अधिसूचना –
https://www.besil.com/uploads/vacancy/454AICTE17may24pdf-57009e28724fe7fd3cb3a760b316bc37.pdf
अर्ज लिंक-
https://besilregistration.in/
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख – 29 मे 2024
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी अर्जात त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
अर्ज भरताना उमेदवाराला अर्जाची फी भरावी लागेल.
इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे.