Download App

आयुष्मान खुराना अमेरिकेच्या म्युझिक टूरसाठी रवाना, शिकागो, न्यूयॉर्कसह ‘या’ शहरात करणार धमाका

Ayushmann Khurrana : बॉलीवूड सुपरस्टार आणि गायक आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) आज सकाळी मुंबई विमानतळावर स्टायलिश अंदाजात

  • Written By: Last Updated:

Ayushmann Khurrana : बॉलीवूड सुपरस्टार आणि गायक आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) आज सकाळी मुंबई विमानतळावर स्टायलिश अंदाजात अमेरिकेच्या टूरसाठी जाताना पाहिलं गेलं, जिथे तो त्याच्या बँड ‘आयुष्मान भव’ सोबत आपल्या कॉन्सर्ट्सची सुरुवात शिकागोमध्ये 14 नोव्हेंबर 2024 पासून करणार आहे. शिकागोनंतर, न्यूयॉर्क, सैन होजे, न्यू जर्सी आणि डलास या चार शहरांत 24 नोव्हेंबरपर्यंत ही म्यूजिक टूर होणार आहे.

आयुष्मान खुराना त्यांच्या वेगळ्या चित्रपट निवडीसाठी आणि बहुआयामी प्रतिभेसाठी ओळखला जातो. चित्रपटांपासून संगीतापर्यंत, त्यांच्या कामात नेहमीच काहीतरी ताजेपण आणि विचारशीलता दिसून येते. आता ते आपला संगीत अमेरिका नेणार आहेत, जिथे ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अनोख्या संगीताच्या दुनियेत घेऊन जाणार आहेत.

टूरबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला , “कलाकार म्हणून मला नेहमीच माझ्या संगीत आणि चित्रपटांचा आस्वाद घेणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष जोडलेलं आवडतं. मी त्यांचे प्रतिसाद प्रथम दर्शनी पाहू इच्छितो. मी माझ्या कामातून त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संगीत निर्मिती आणि कॉन्सर्टमधून माझ्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यांना माझ्या संगीताच्या माध्यमातून माझं मनोगत सांगण्याचा मोठा संधी आहे.

कॉलेजमध्ये मी म्युझिकल्समध्ये काम केलं आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी घरी परतल्यासारखंच आहे!” जेव्हा त्याने ‘पाणी दा रंग’ या गाण्याद्वारे आपल्या गायनाची सुरुवात केली आणि गाणं हिट झालं, तेव्हा सगळ्यांना त्याच्या प्रतिभेची कल्पना आली. संगीताविषयी आपल्या प्रेमाबद्दल तो म्हणतो, “मी नेहमीच अभिनेता बनण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण संगीत हा माझा दुसरा पैलू आहे. प्रत्येकाकडे एकतरी समांतर ध्येय असावं लागतं, आणि मी भाग्यवान आहे की मला गीतलेखन, गायन आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची कला मिळाली. स्टेजवर परफॉर्म करणं हे माझं पहिलं प्रेम आहे कारण हे चाहत्यांशी थेट जोडणारा माध्यम आहे. मला आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.” हे आयुष्मानचं दुसरं यूएस टूर आहे.

अनुपम खेरच्या ‘विजय 69’ मधील अभिनयावर किरण खेर यांनी केले मनःपूर्वक कौतुक

आठ वर्षांनंतर परतण्याबद्दल तो म्हणाला, “ही माझी दुसरी अमेरिकन टूर आहे आणि मी प्रचंड उत्सुक आहे कारण आठ वर्षांनंतर तिथे परफॉर्म करणार आहे. मी इच्छितो की लोकांना माझ्या संगीतामुळे भावनांचा झपाटून टाकणारा अनुभव मिळावा, आणि ज्या लोकांना तिथे येणं शक्य नाही, त्यांना जाणवावं की त्यांनी काही खास मिस केलं आहे. असं झालं तर माझ्या संगीताने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला असं मी मानेन.”

follow us