Download App

‘Dream Girl 2’ मधील आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, ऑगस्टच्या ‘या’ तारखेला होणार रिलीज

Dream Girl 2 Poster: आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. एकीकडे तो एका मुलीच्या गेटअपमध्ये आहे आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे, तर दुसरीकडे तो देखणा अवतारात दिसून येत आहे, आणि त्याच्या हातात लिपस्टिक देखील असल्याचे दिसून येत आहे.


राज शांडिल्य दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल 2’ हा 2O19 मध्ये रिलीज झालेल्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे. आयुष्मान या सिनेमात पूजाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्यामध्ये ड्रीम गर्लच्या प्रेमकथेच्या अलीकडच्या झलकमध्येही तिचा सुंदर चेहरा दिसला नाही. तेव्हा चाहत्यांच्या हताशपणाची पातळी आणखी वाढल्याचे दिसून आले आहे.

मात्र आता या सिनेमाच्या नव्या आणि मनोरंजक पोस्टरमुळे ड्रीम गर्लची झलक बघण्यसाचे स्वप्न आता साकार झाल्याचे दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर ‘ड्रीम गर्ल 2’ ची रिलीज डेट जाहीर केली आहे. तसेच या सिनेमाचा पहिला टीझर देखील रिलीज करण्यात आला होता. आयुष्मानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर २५ ऑगस्ट २०२३ च्या रिलीजची तारीख जाहीर करणारा टीझर शेअर केला आहे.

Aflatoon ची ‘अफलातून’ कमाई, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘ड्रीम गर्ल 2’ ही एका छोट्या शहरातील मुलाचा प्रवास आहे. जो मथुरेत वास्तव्यास असतो आणि परी (अनन्या) च्या प्रेमात पडतो, तेव्हाच त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, ज्यामुळे त्याच्या आधीच गोंधळलेल्या आयुष्यात भर पडते. या चित्रपटाबद्दल बोलताना, आयुष्मान एका निवेदनात म्हणाला, “मी ‘ड्रीम गर्ल 2’ साठी खूप उत्सुक आहे! बालाजी मोशन पिक्चर्ससोबतचा हा माझा दुसरा प्रवास आहे आणि त्यासाठी मी एकताचा आभारी आहे. त्याने ही फ्रेंचायझी घेतली आहे. पुढे जाऊन ते मोठे केले. मला राजमध्ये एक मित्र सापडला आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा काम करणे खूप आनंददायी आहे.

Tags

follow us