Aflatoon ची ‘अफलातून’ कमाई, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Aflatoon ची ‘अफलातून’ कमाई, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Aflatoon film box office collection : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने चार दिवसांत किती कमाई केली, याचा आकडा समोर आला. (Marathi film Aflatoon box office collection)

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? काय उणीव राहिली?

तीन जिवलग गुप्तहेर मित्रांची मजेशीर धमाल असलेल्या ‘अफलातून’ या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाला सर्वच स्तरातील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशीही अपेक्षेप्रमाणे चांगली कमाई केली. यामध्ये चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याचं दिवशी 95 हजार तर दुसऱ्या दिवशी 2.03 कोटी तिसऱ्या दिवशी 2.88 कोटी तर आता चौथ्या दिवशी देखील या चित्रपटाने 1.29 कोटी कमावले आहेत. त्यामुळे या चित्रपटाने चार दिवसांत एकूण 7.17 कोटी कमावले आहेत.

Twitter is Now X: फक्त ट्विटरच नाही तर ‘या’ 12 कंपन्यांनीही बदलले आहे आपले नाव

हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, जॉनी लिवर, जेसी लिवर, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, तेजस्विनी लोणारी, विजय भटकर, भरत दाभोळकर, रेशम टिपणीस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन परितोष पेंटर यांनी केले आहे. हा चित्रपट 21 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

तीन जिवलग गुप्तहेर मित्रांची मजेशीर धमाल असलेल्या ‘अफलातून’ या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मराठी चित्रपटांना सध्या चांगले यश मिळत आहे. त्यात बाई पण भारी देवा या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या यशाची अनेक शिखरं पार केली असताना आता अफलातून देखील अफलातून कमाी करत असल्याचं पाहायाला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube