Download App

Ayushmann Khurrana: महाशिवरात्रीला अभिनेत्याने पूर्ण केली वडिलांची इच्छा, म्हणाला…

Ayushmann Khurrana On Mahashivratri: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आजही वडिलांच्या मृत्यूला सामोरे जात आहे. शिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी, आयुष्मानने शिव कैलास स्तोत्राचे गायन केले, जे त्याच्या वडिलांकडून ऐकण्याची इच्छा होती. आयुष्मानने आज हे सुंदर भजन त्याच्या सोशल मीडियावर (Social media) अपलोड केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली की, “#महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक कौटुंबिक गोष्ट आहे. बाबा- आई @aparshakti आणि मी दरवर्षी पंचकुला मंदिरात जायचो.

गेल्या वर्षी जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांनी शिवरात्रीच्या वेळी एकट्याने मंदिरात जाण्याचे धैर्य दाखवले, ते भगवान शिवाचे प्रखर शिष्य होते. त्यांच्याशिवाय ही आमची पहिली शिवरात्री आहे. ते पुढे म्हणतात, “त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये, त्यांनी मला @paddyshivoham चे हे स्तोत्र पाठवण्याची विनंती केली होती. जेव्हा पण पप्पा स्त्रोत ऐयकायचे ते बोलत असत की बेटा तुझ्या अवाजात खुप सुंदर वाटेल, अशी पोस्ट अभिनेत्याने यावेळी केली आहे.


आयुष्मानच्या वडिलांचं नाव पी. खुराणा असं होते, ते खूप लोकप्रिय ज्योतिषतज्ञ होते. पंडित पी खुराना हे ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी सुप्रसिद्ध होते. ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक पुस्तक देखील त्यांनी लिहिली आहेत. ज्योतिषशास्त्रात त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जात असतं. पी खुराना यांचा 18 मे ला वाढदिवस होता. मात्र त्यांनी प्रकृती खालावल्याने अखेर 19 मेला अखेरचा श्वास घेतला. पी खुराना ख्यातनाम ज्योतिषी असून त्यांनी 34 पुस्तके लिहिली आहेत.

Rashi Khanna: महिला दिनानिमित्त ‘स्त्रीत्वाबद्दल अभिनेत्रीचा अनोखा दृष्टीकोन; म्हणाली, “परिपूर्णता…”

आयुष्मान खुरानाने अनेकदा आपल्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत असतो. आपल्या यशात वडिलांचा खूप मोठा वाटा असल्याचे अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आयुष्मानने एक फोटो शेअर केले होते, त्याची खूपच चर्चा रंगली होती.

follow us