Baba Siddique’s iftar party: रमजानचा (Eid) पवित्र महिना सुरू झाला आहे. उपवासासोबतच सर्वजण ईदच्या तयारीला ही लागलेले असतात. घर सजवण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत लोक बाजारात पोहोचू लागतात. (Iftar Party 2024) त्याच वेळी, रमजानच्या महिन्यात लोक त्यांच्या घरी इफ्तार पार्टी देत असतात. यामध्ये मित्र आणि नातेवाईकांना बोलावले जाते. दरवर्षी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. आता यंदा ही पार्टी कुठे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 मधली भव्य दिव्य होणारी इफ्तार डिनर पार्टी अगदीच जवळ आली असून या वर्षी काय नवीन घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या 35 वर्षा पासूनची ही अनोखी परंपरा 1989 मध्ये ‘ईद मिलन’ नंतर सुरू झाली. सिद्दिक यांनी समविचारी होऊन धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्र घेऊन येऊन या ‘इफ्तारी डिनरची सुरुवात केली. सगळेच या इफ्तार डिनर परंपरेची झलक पाहण्याची वाट पाहत असताना यंदाची इफ्तार लवकरच होणार आहे. ज्यात अनेक बड्या कलाकारांची झलक अनुभवयाला मिळणार आहे.
पुन्हा एकदा 24 मार्च 2024 रोजी मुंबईतील ताज लँड्स एन्ड येथे यंदाची इफ्तार पार्टी पार पडणार असून तारे तारकांच्या उपस्थितीत ही खास रात्र अजून अविस्मरणीय होणार आहे. या वर्षीचा कार्यक्रम देखील नेत्रदीपक सोहळा होणार यात शंका नाही. सलमान खानने मागच्या वर्षी स्वतःच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सलमान खान आणि शाहरुख खान व्यतिरिक्त, संजय दत्त, सुनील शेट्टी, अनिल कपूर, इमरान हाश्मी, कतरिना कैफ, उर्मिला मातोंडकर, कपिल शर्मा, भारती सिंग, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, शहनाज गिल, अंकिता लोखंडे, यांसारखे आयकॉन आणि मेगास्टार यांनी मागच्या वर्षी इफ्तार पार्टीत येऊन या कार्यक्रमाची सांगता केली.
खिलाडी कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीजची डेट ठरली
2024 ची इफ्तार डिनर पार्टी केवळ एका दिवसासाठी एक सेलिब्रेशन नसून अनेकांना आठवणींचा उजाळा देऊन जाणार आहे. इफ्तारचे खरे महत्त्व हे आहे की मित्र, कुटुंब आणि विविध क्षेत्रातील विविध व्यक्ती आपली संस्कृती, परंपरा आणि आनंद एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी एकत्र येतात.