Download App

Bade Miyan Chote Miyan चं आणखी एक गाण प्रेक्षकांच्या भेटीला, टायगर-मानुषीचा चार्टबस्टर डान्स व्हायरल

Bade Miyan Chote Miyan: बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” ( Bade Miya Chhote Miya ) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) मधील आणखी एक गाण ‘वल्लाह हबीबी’ (Vallah Habibi ) हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….

ज्यामध्ये बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि अष्टपैलू अभिनेत्री मानुषी छिल्लर दिसणार आहेत. टायगर श्रॉफ आणि त्याच्या अतुलनीय डान्स मूव्ह यातून बघायला मिळणार आहेत. अलाया एफ आणि अक्षय कुमार देखील या गाण्यात दिसणार आहेत हे गाणं चार्टबस्टर ठरणार यात शंका नाही. निर्मात्यांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मस्त मलंग झूम’चे शीर्षक गीत रिलीज केले होते. बॉलीवूड चा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार हे दोघे यातून पहायला मिळाले असताना आता पुन्हा एकदा ‘वल्लाह हबीबी’ हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे.

‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार: फेब्रुवारी 2023साठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला असून पूजा एंटरटेनमेंट आणि एफझेड फिल्म्सचे समर्थन आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबतच, चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसणार आहे, जो नुकताच ‘सालार पार्ट वन: सीझफायर’ मध्ये दिसला होता.

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी जवळपास 75 दिवस या चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज