‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द

‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द

Sharad Pawar On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं आहे. सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील महत्वाचा मानला जाणारा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा (VBA) आकड्यांचा खेळ जुळत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलतान शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) शब्दच दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारी आम्ही सोडवणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; प्रताप ढाकणेंचे आमदार राजळेंना चॅलेंज!

प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागांची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीकडून वंचितला अवघ्या दोन जागा देत असून आमचा अवमान केला जात असल्याचं स्पष्टीकरण वंचितकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर अद्याप तरी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही.

‘शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक, CM शिंदेंनी त्यांना समज द्यावी’; इतिहास सांगत तटकरेंनी फटकारलं

शरद पवार म्हणाले, जागावाटपाचा निर्णय अंतिम करण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीच थांबलो आहोत. आमची इच्छा आहे की त्यांनी यावं. त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घेऊ. त्यावर कार्यवाही करण्याचीही आमची तयारी आहे. प्रकाश आंबेडकर नेहमी सांगतात की मोदींचं राज्य घालवायचं आहे त्यांच्या या विचारात आणि आमच्यात साम्य आहे. त्यामुळे जागावाटपात काही अडचणी असतील तर त्या सामंजस्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

अडल्ट फिल्मस्टार Sophia Leone ने वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अपार्टमेंटमध्ये आढळलं शव

दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फुट पडलेली आहे. दोन्ही पक्षातील मोठा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला आहे. त्यामुळे आमचा वंचित पक्ष महाविकास आघाडीत मोठा असून आम्हाला 12 जागा देण्यात याव्यात अशी भूमिकाच प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती. आता पुढील काळात शरद पवारांच्या मध्यस्थीने हा जागा वाटपाचा तिढा सुटणार का? आगामी निवडणुकीत वंचित महाविकास आघाडीसोबत असणार का? हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube