‘शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक, CM शिंदेंनी त्यांना समज द्यावी’; इतिहास सांगत तटकरेंनी फटकारलं

‘शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक, CM शिंदेंनी त्यांना समज द्यावी’; इतिहास सांगत तटकरेंनी फटकारलं

Sunil Tatkare replies vijay Shivtare : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात (Lok Sabha Election) राजकीय फटाके फुटू लागले आहेत. पुण्यातील लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. बारामती लोकसभेची निवडणुकही (Baramati) आधीच चर्चेत आहे. येथे तर राजकीय बदला घेण्याचीच भाषा केली जात आहे. अजित पवार यांनी महायुतीत एन्ट्री घेतल्यानंतरही जुना संघर्ष मिटलेला नाही. माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाचाही सातबारा नाही असे म्हणत पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पलटवार केला आहे. महायुती भक्कम असताना असे वक्तव्य करणे गैर आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

Loksabha Elections 2024 : 80 टक्के काम पूर्ण, 20 टक्के उमेदवारांबाबत आम्ही तिघे; फडणवीसांनी केलं स्पष्ट

माजी आमदार विजय शिवतारेंचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि संतापजनक आहे. त्यांच्या वक्तव्याचा काही जणांना आनंद झाला असेल पण त्यांना हे माहिती नसेल की 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना जे आव्हान दिलं होतं, ते शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच दिलं होतं. राज्यात महायुती भक्कम काम करत असताना शिवतारेंनी असं वक्तव्य करणं गैर आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करतो की शिवतारेंच्या वक्तव्याची गंभीर नोंद घ्यावी आणि त्यांना समज द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय मानायचा की नाही, हे शिवतारेंच्या हातात आहे, असे तटकरे म्हणाले.

काय म्हणाले होते शिवतारे ?

बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आली आहे, असा एका जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुले आव्हान देत शिवतारे यांना पराभवाचा धक्का दिला होता. महायुती झाली असली तरी त्याची खंत शिवतारे यांच्या मनात आहे. यावरून ते सुनेत्रा पवार यांचे काम करणार नाहीत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा धक्काच आहे.

Maharashtra Politics : ‘2015 नंतर राष्ट्रवादीत निवडणुकाच नाहीत’ तटकरेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

अजितदादांचे काय आव्हान होते ?
तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर, मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” असे थेट आव्हान शिवतारेंना दिले होते. हे आव्हान अजितदादांनी खरे करून दाखविले होते. शिवतारे हे तब्बल पंचवीस हजार मते पुरंदर मतदारसंघात पराभूत झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube