अडल्ट फिल्मस्टार Sophia Leone ने वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अपार्टमेंटमध्ये आढळलं शव
Sophia Leone : अडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लियोनी ( Sophia Leone ) हीच निधन झालं आहे. गेल्या आठवड्यामध्ये ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. वयाच्या 26 व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. तिच्या कुटुंबाकडून तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी तिच्या कोणताही संपर्क होऊ शकला नसताना तिचे निधन झाल्याचं समोर आलं आहे. तिचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी ही माहिती दिली.
अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला; शेळकेंचे पवारांवर गंभीर आरोप
दरम्यान गेल्या आठवड्यातच सोफियाला तिच्या सोशल मीडिया साइटवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामध्ये तिने काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यानंतर आता सोफियाचे सावत्र वडील यांनी फंडिंग पेजवर तिच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, तिची आई आणि कुटुंब यांच्याकडून अत्यंत जड अंतकरणाने मी सोफियाच्या निधनाची बातमी देत आहे. सोफियाच्या निधनाने तिचं कुटुंब आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक अडल्ट फिल्म अभिनेत्रींचं निधन झाल्याचे समोर येत आहे. त्यामध्ये आता सोफियाच्या निधनाने नवीन वाद निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चौथ्या अडल्ट फिल्म अभिनेत्रीचा निधन झालं आहे या अगोदर काग्नी ली हिने वयाच्या 36 व्या वर्षी आत्महत्या केली. तर जानेवारीमध्ये जेसी जेन हीचा मृतदेह तिचा प्रियकर ब्रेट हसनमुलर याच्यासोबत आढळून आला होता.