अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला; शेळकेंचे पवारांवर गंभीर आरोप
Sunil Shelke : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांनी अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला ठेऊन काहींची रणनीती आखली जात असल्याचा गंभीर आरोप करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधाला आहे. तसेच त्यांनी आपल्यावर टीका केल्या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले सुनील शेळके?
यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, सुप्रिया ताईंना देखील माझं सांगणं आहे. सुनील शेळकेला खासदार व्हायचे नाही. त्याच्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं नाही. पण अजितदादा यांना मुख्यमंत्री पदावर बसू द्यायचं नाही. यासाठी जी काही रणनीती काही मंडळींनी सुरू केली आहे. यासाठी शेकडो माणसं कामाला ठेवून करोडो रुपये खर्च करून दादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू आहे. या पुढच्या काळामध्ये मला काही गोष्टी सांगाव्या लागतील.
जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!
तसेच शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. असे मी कोणालाही फोन करून किंवा धमकावून सांगितलं नव्हतं. पण त्यांनी थेट माझं नाव घेऊन असं का बोलले? हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. ते मला योग्य वाटत नाही त्या संदर्भात मी साहेबांची भेट घेणार आहे. त्यांना विचारणार आहे की, आपण माझ्या बाबतीमध्ये एवढे टोकाला जाऊन भूमिका का घेतली? असं शेळके म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?
दरम्यान दोन दिवसांपूर्वी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा द्या अन्यथा खोटे आरोप केल्याचं कबूल करा. असं म्हणंत थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे.