Sunny Leone: सनी लिओनी पुन्हा ठरली ‘नंबर वन’; ‘या’ नवीन रिअॅलिटी शो’ची होणार जज
Sunny Leone: पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (Sunny Leone). सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली. सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. आता अभिनेत्री सनी आणखी एक भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली असून ती आता नवीन भूमिकेत बघायला मिळणार आहे. तिच्या आगामी रिअॅलिटी शो ‘ग्लॅम फेम’ मध्ये ( Reality Show) जजच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.
View this post on Instagram
सनी लिओनीला जज होण्याबद्दलचा विचारले असता तिने सांगितले आहे की, “मॉडेलला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करियरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शो मधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची अनोखी जवाबदारी माझ्यावर आहे, आणि यासाठी मी उत्सुक आहे. मॉडेलने सध्याचा ट्रेंड समजून घेतला पाहिजे आणि हे व्यासपीठ प्रतिभावान तरुणांना प्रेरणा देताना दिसणार आहे.
या शोमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश आणि ईशा गुप्ता यांच्यासमवेत सनी लिओनी एका जजिंग पॅनेलचा भाग असणार आहे. ‘ग्लॅम फेम’ स्पर्धकांना या उल्लेखनीय व्यक्तींना अनोखी संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, रोहित खंडेलवाल, संतोषी शेट्टी, दिनेश शेट्टी आणि प्रसिद्ध फॅशन आणि लाइफस्टाइल फोटोग्राफर डब्बू रतनानी यांसारखे मार्गदर्शक याचा भाग बनणार आहे.
Animal: 888 स्क्रिन्सवर रिलीज होणार ‘ॲनिमल’, बाॅक्स ऑफिसवर तोडणार सर्व रेकाॅर्ड?
या अगोदर सनीने मामी मधल्या खास स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज कलाकार आणि चित्रपट रसिकांनी हजेरी लावली होती. या वर्षाच्या मे महिन्यात ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या ‘मिडनाईट स्क्रीनिंग’मध्ये प्रीमियर झाल्यापासून ‘केनेडी’ने जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवली आहे. सनी लिओनीची ‘चार्ली’ भूमिकेला देखील सर्वत्र प्रेम मिळवत असल्याचे बघायला मिळत आहे.
सनी लिओनी ही केवळ फॅशन आयकॉन आणि स्टार नाही तर आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी तयार असलेली एक अष्टपैलू कलाकार देखील आहे. जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यांसह ‘कोटेशन गँग’ मधून ती लवकरच तमिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे.