Download App

Bade Miyan Chote Miyan चा धडाकेबाज टीझर रिलीज; टायगर-अक्षयच्या ॲक्शनने चाहते थक्क

Bade Miyan Chote Miyan : ॲक्शनने भरपूर असलेला टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा (Tiger and Akshay) बडे मिया छोटे मिया (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान आता चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्वाची बातमी! यावर्षी परीक्षेचा कालावधी वाढणार

आज 24 जानेवारीला निर्मात्यांकडून बडे मिया छोटे मियाचा ऍक्शन आणि कॉमेडीने भरपूर असलेला टीझर रिलीज करण्यात आला. यामध्ये अनेक हेलिकॉप्टर्स मिसाईलन्स आणि स्फोट दाखवण्यात आले आहेत. टायगर आणि अक्षय सह या टीझरमध्ये चित्रपटाचा खलनायक पृथ्वीराज सुकुमारन याचा आवाज देखील ऐकू येत आहे. टीझरमध्ये पृथ्वीराज म्हणत आहे की, ‘प्रलय आनेवाला हैं. एक ऐसा प्रलय जो भूत, भविष्य, वर्तमान को बदल देगा. जो अच्छाई और बुराई की जंग को हमेशा के लिए खत्म करके हिंदुस्तान खत्म हो जायेगा, मुझे कौन रोकेगा.’

इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार

त्यानंतर चित्रपटाचे नायक अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची धमाकेदार एंट्री दाखवण्यात आली आहे. हे दोघेजण या चित्रपटांमध्ये आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहेत. त्यामध्ये टायगर श्रॉफचा डायलॉग आहे. ‘दिल से सोल्जर दिमाग शैतान हैं हम. तर अक्षय कुमार म्हणत आहे. बचके रहना हिंदुस्तान है हम’. जबरदस्त डायलॉग सोबतच या टीझ मध्ये धमाकेदार ॲक्शन पाहायला मिळत आहे. चाहत्यांचं या चित्रपटातून भरपूर मनोरंजन होणार एवढं नक्की.

ग्रामीण अर्थकारणावर आता थेट केंद्र सरकारचा ‘वॉच’ : 12 हजार सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण सुरु

या टीझर बरोबरच बडे मिया छोटे मिया या चित्रपटाची रिलीज डेट देखील निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट एप्रिल 2024 ला ईद या सणाच्या निमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार टायगर श्रॉफ यांच्या सोबतच खलनायकाची भूमिका साकारणारा पृथ्वीराज सुकुमारन आणि सोनाक्षी सिन्हा, अलाय एफ, रोनित रॉय आणि मानुषी चिल्लर यांचे देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us

वेब स्टोरीज