Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडीचा टीझर

Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडीचा टीझर

Bade Miyan Chote Miyan Teaser Releasing Date : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा मेगा बजेट सिनेमा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या (Bade Miyan Chote Miyan) टीझर रिलीजची अखेर तारीख ठरली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी 2023 च्या प्रजासत्ताक दिन 2024 चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये अ‍ॅक्शन-पॅक मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळतं आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा जॅकी भगनानीच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत आहे. 300 कोटींच्या मेगा बजेट सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अली अब्बास जफरवर (Ali Abbas Jafar) यांनी सांभाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अली अब्बासला दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्ससोबत सिनेमा बनवायचा होता. त्यामुळे आता त्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून तो सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. अली अब्बास जफर पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील दोन अभिनेत्यांचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!

सिनेमाचे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे, बहुतेक बजेट कलाकारांच्या फीवर खर्च केले जाणार आहे. अली अब्बास जफर या सिनेमावर बजेटमधील फक्त 100 कोटी खर्च करणार आहे. बॉलीवूडमध्ये दोन अ‍ॅक्शन हिरोंचे सिनेमा क्वचितच बनतात कारण दोन स्टार्सची फी बजेटच्या सर्व मर्यादा पलीकडे जात आहे. टायगर चा आगामी सिनेमा “बडे मियाँ छोटे मियाँ” चे निर्माते प्रजासत्ताक दिन 2024 च्या शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube